10 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
10 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 डिसेंबर 2022)
‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा :
- गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.
- यंदा भाजपाने 150 पेक्षा जास्त जागांसह विक्रमी विजय मिळवला आहे.
- तर दुसरीकडे ही निवडणूक आम आदमी पार्टीसाठी विशेष ठरली आहे.
- कारण या निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे.
- या संदर्भात बोलताना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरद्वारे गुजरातमधील जनतेचे आभार मानले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
‘या’ व्यक्तीने पहिल्या स्थानावर घेतली उडी :
- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये मागील बऱ्याच काळापासून पहिल्या क्रमांकावर असलेल्या एलॉन मस्क यांनी हे स्थान गमावलं आहे.
- ट्विटरचे नवे मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या एलॉन मस्क यांना लुईस व्हुइटनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेनार्ड अरनॉल्ट यांनी मागे टाकलं आहे.
- फोर्ब्समधील यादीनुसार लुईस यांची संपत्ती 185.8 बिलियन डॉलर्स इतकी आहे.
- मस्क यांच्या संपत्तीपेक्षा ही संपत्ती 400 मिलियन डॉलर्सने अधिक आहे.
‘या’ भारतीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय सामन्यात लगावलेत सर्वाधिक षटकार :
- सूर्या या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
- त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 74 षटकार ठोकले.
- या वर्षी आतापर्यंत इंग्लंडचा जोस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने मारलेल्या षटकारांपेक्षा हे जास्त आहेत.
- 2022 मध्ये, बटलरने 39 षटकार मारले आहेत. तसेच मिलरने 31 षटकार मारले आहेत.
- सूर्यकुमारने यावर्षी एकूण 44 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
- यामध्ये त्याने 40.68 च्या सरासरीने आणि 157.87 च्या स्ट्राईक रेटने 1424 धावा केल्या.
- निकोलस पूरन या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
- त्याचबरोबर यूएईचा मोहम्मद वसीम 58 षटकारांसह तिसऱ्या, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा 55 षटकारांसह चौथ्या आणि रोहित शर्मा 45 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.
- त्याचबरोबर वनडेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे.
इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध रचला इतिहास :
- पाकिस्तान आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.
- बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाने शुक्रवारी, पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला आहे.
- 2000 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा इंग्लंड हा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ ठरला आहे.
- इंग्लंडनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे.
- त्याचबरोबर भारत 1775 सामन्यांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
- तसेच पाकिस्तान 1608 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
दिनविशेष:
- 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून पाळला जातो.
- सन 1901 मध्ये नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
- संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सन 1916 मध्ये झाला.
- सन 1998 मध्ये अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ ‘प्रा. अमर्त्य सेन‘ यांना प्रदान झाला.