Rajyaseva Pre-Exam Question Set 5

Rajyaseva Pre-Exam Question Set 5

राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. 1 : 5-04-2015

1. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ति संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला?

  1.  देवीसिंह चौहान
  2.  दिगंबर कुलकर्णी
  3.  विनायक विद्यालंकार
  4.  नारायण पवार

उत्तर :नारायण पवार


 2. ‘हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत’ असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे?

  1.  महात्मा गांधी
  2.  सरोजिनी नायडू
  3.  जवाहरलाल नेहरू
  4.  तेज बहादूर सप्रु

उत्तर :सरोजिनी नायडू


 3. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?

  1.  आर्य महिला समाज
  2.  भारत महिला परिषद
  3.  द मुस्लिम विमेन्स अॅसोसिएशन
  4.  भारत स्त्री महामंडळ

उत्तर :भारत स्त्री महामंडळ


 4. —– स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.

  1.  मुसलमानांच्या ईद सणावरून
  2.  मुसलमानांच्या मोहरम सणावरुन
  3.  बंगालच्या दुर्गा पूजेवरून
  4.  योम किप्पुर सणावरून

उत्तर :मुसलमानांच्या मोहरम सणावरुन


 5. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?

  1.  मिसीसिपी
  2.  अमेझोन
  3.  कोलोरॅडो
  4.  बियास

उत्तर :कोलोरॅडो


 6. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?

  1.  उष्णोदकाचे फवारे
  2.  बॅथोलिथ
  3.  डाईक
  4.  घडया

उत्तर :घडया


 7. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना —– यांचा पाठींबा होता.

  1.  टिळक
  2.  गांधीजी
  3.  अली बंधु
  4.  मोतीलाल नेहरू

उत्तर :गांधीजी


 8. सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध —– आहे.

  1.  अन्न उत्पादन
  2.  दुग्ध उत्पादन
  3.  मधुमक्षिका पालन
  4.  फुलोत्पादन

उत्तर :मधुमक्षिका पालन


 9. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात —– या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.

  1.  वडाळा
  2.  वाडीबंदर
  3.  विलेपार्ले
  4.  अंधेरी

उत्तर :विलेपार्ले


 10. मुगा रेशमीच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन —– राज्यांत होते.

  1.  आसाम आणि बिहार
  2.  बिहार आणि उत्तर प्रदेश
  3.  कर्नाटक आणि तामिळनाडू
  4.  काश्मीर आणि हिमाचल प्रदेश

उत्तर :आसाम आणि बिहार


 11. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?

  1.  अरुणाचल प्रदेश
  2.  छत्तीसगड
  3.  हिमाचल प्रदेश
  4.  गुजरात

उत्तर :हिमाचल प्रदेश


 12. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?

  1.  दख्खनचे पठार
  2.  अरेबियाचे पठार
  3.  ब्राझिलचे पठार
  4.  तिबेटचे पठार

उत्तर :तिबेटचे पठार


 13. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात?

  1.  दक्षिण अमेरिका
  2.  आफ्रिका
  3.  आशिया
  4.  युरोप

उत्तर :आफ्रिका


 14. —– प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.

  1.  वनस्पती
  2.  किटके
  3.  मनुष्य
  4.  प्राणी

उत्तर :किटके


 15. खालीलपैकी कोणता वायु पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?

  1.  नायट्रोजन
  2.  सल्फर डायऑक्साईड
  3.  कार्बन डायऑक्साईड
  4.  वरील सर्व

उत्तर :नायट्रोजन


 16. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे (हम दो हमारे दो) कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे?

  1.  कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952
  2.  वीस कलमी कार्यक्रम
  3.  राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000
  4.  नवीन लोकसंख्या धोरण 2011

उत्तर :राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000


 17. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतीबंध करण्याचे धोरण स्वीकारले?

  1.  आर्टिकल 36
  2.  आर्टिकल 46
  3.  आर्टिकल 39
  4.  वरीलपैकी एकही नाही

उत्तर :आर्टिकल 46


 18. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे?

  1.  85 कोटी
  2.  115 कोटी
  3.  200 कोटी
  4.  वरीलपैकी एकही नाही

उत्तर :115 कोटी


 19. 9 व्या व 10 व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता.

  1.  4% व 5% अनुक्रमे
  2.  5% व 7% अनुक्रमे
  3.  4% व 7% अनुक्रमे
  4.  7% व 5% अनुक्रमे

उत्तर :4% व 5% अनुक्रमे


 20. राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्टे होते?

  1.  10 वी पंचवार्षिक योजना
  2.  8 वी पंचवार्षिक योजना
  3.  12 वी पंचवार्षिक योजना
  4.  11 वी पंचवार्षिक योजना

उत्तर :10 वी पंचवार्षिक योजना

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.