22 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

22 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2022)

रिलायन्स उद्योग समूहाकडून ‘मेट्रो इंडिया’चे अधिग्रहण :

  • रिलायन्स उद्योग समूहाची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) कडून जर्मन रिटेलर मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.
  • 22 डिसेंबर रोजी याबाबतचा करणार करण्यात आला असून हा करार 2850 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याची माहिती रिलायन्स उद्योग समूहाकडून जारी प्रसिद्धीपत्रकारद्वारे देण्यात आली आहे.
  • ‘मेट्रो इंडिया’ कंपनी खरेदी केल्यानंतर ‘रिलायन्स रिटेल’ची आता डीमार्ट (D-Mart) आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे.

‘आयपीएल’मध्येही प्रभावी खेळाडूचा नियम :

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या आगामी हंगामात प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) हा नियम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या नियमाचा पहिला प्रयोग यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत झाला होता.
  • हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे ‘आयपीएल’मध्येही हा नियम वापरला जाईल.
  • ‘आयपीएल’ संघांना एका सामन्यात चार परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असते.
  • परंतु सामन्याच्या सुरुवातीला संघात तीनच परदेशी खेळाडूंना स्थान दिल्यास प्रभावी खेळाडू म्हणून सामन्यादरम्यान चौथा परदेशी खेळाडू मैदानावर आणण्याची संघाला परवानगी असेल.

भारताचा ‘हा’ खेळाडू ‘सर डॉन ब्रॅडमनचा’ मोडणार विक्रम :

  • भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
  • जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी भारताला येथून उर्वरित पाच कसोटी सामने जिंकावे लागतील.
  • भारताचे अनेक स्टार खेळाडू जसे की रोहित शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या कसोटी मालिकेत खेळत नाहीत.
  • पुजाराने या मालिकेतही शतक झळकावले आहे.
  • पुजाराचे हे शतक 1443 दिवसांनी म्हणजेच तीन वर्षे 11 महिने आणि 13 दिवसांनी आले आहे.
  • बांगलादेशविरुद्धचे शतक हे पुजाराच्या कसोटी कारकिर्दीतील 19वे शतक होते.
  • या प्रकरणात त्याने न्यूझीलंडच्या रॉस टेलर, वेस्ट इंडिजच्या गॉर्डन ग्रीनिज आणि क्लाइव्ह लॉयड आणि ऑस्ट्रेलियाच्या माइक हसीची बरोबरी केली.
  • आता दुस-या कसोटीतही पुजाराची नजर आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवण्यावर असेल.
  • तसेच, पुजाराला ऑस्ट्रेलियाचे माजी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकण्याची संधी आहे.

दिनविशेष:

  • 22 डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय गणित दिन‘ आहे.
  • सन 1851 मध्ये भारतातील पहिली मालगाडी रूरकी येथे सुरू करण्यात आली.
  • भारतीय तत्त्वज्ञ ‘सरदादेवी‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला होता.
  • थोर भारतीय गणिती ‘श्रीनिवास रामानुजन‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
  • भारतातील विश्वभारती विद्यापीठ सन 1921 मध्ये सुरू झाले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.