Rajyaseva Pre-Exam Question Set 10

Rajyaseva Pre-Exam Question Set 10

राज्य सेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. 1 (18 मे 2013)

1. खालीलपैकी कशास एंझाईम्सचा को-फॅक्टर असे म्हणतात येईल?

  1.  लोह
  2.  जीवनसत्व-ड
  3.  प्रथिने
  4.  कार्बोदके

उत्तर : लोह


 2. खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे?

  1.  ग्लुकोकॉर्टीकॉईड
  2.  प्रोजेस्टेरॉन
  3.  टेस्टोरॉन
  4.  इंसुलीन

उत्तर :ग्लुकोकॉर्टीकॉईड


 3. वनस्पतीशास्त्रनुसार फायबर वनस्पतीपासून ‘बास्ट फायबर्स’ मिळतात. प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात?

  1.  रसवाहिन्या
  2.  जलवाहिन्या
  3.  मुळे  
  4.  पाने

उत्तर :जलवाहिन्या


 4. रेणुमध्ये अणू —– बलाव्दारे एकत्रित ठेवले जातात.

  1.  रेण्वातरीक
  2.  अंत रेणु
  3.  व्दिअग्र
  4.  वान डर वोल्झ

उत्तर : अंत रेणु


 5. पांढर्‍या कापड्यावर पडलेला वरणाचा डाग साबण लावल्यावर लालसर तपकिरी (रेडिश ब्राउन) होतो. तो अधिक पाण्याने धुतल्यावर पुन्हा पिवळा होतो. तो आधी लालसर तपाकिरी (रेडिश ब्राउन) होतो. कारण –

  1.  साबण निसर्गत: बेसिक आहे.
  2.  साबण निसर्गत: अॅसीडीक आहे.
  3.  साबण न्यूट्रल आहे.
  4.  वरील एकही पर्याय योग्य नाही.

उत्तर : साबण निसर्गत: बेसिक आहे.


 6. —– औषधी द्रव्य नैसर्गिक उत्पादन आहे.

  1.  मॉर्फिन
  2.  अॅम्पीसिलीन
  3.  क्लोरोक्कीनाइन
  4.  फिनसायक्लीडीन

उत्तर : मॉर्फिन


 7. बटाटा चिप्स उत्पादक, चीप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायु भरतात. जेनेकरून चीप्स ऑक्सिडाइझ होत नाहीत. खालीलपैकी कोणता वायु यासाठी वापरला जातो?

  1.  हायड्रोजन
  2.  सल्फर डायऑक्साइड
  3.  नायट्रोजन
  4.  कार्बन डायऑक्साइड

उत्तर :नायट्रोजन


 8. कोळश्याचे त्याच्या —– अवस्थेमध्ये रूपांतरण करून त्याचा अतिशय कार्यक्षम व स्वच्छ इंधन म्हणून वापर करता येतो.

  1.  द्रव
  2.  द्रव-घन मिश्रण
  3.  वायु
  4.  द्रव-वायु मिश्रण

उत्तर :वायु


 9. भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत?

  1.  भारतीय संसदीय आयुक्त
  2.  स्कॅन्डीनेव्हियामधील अब्मुड्सन
  3.  रशियातील प्रोसीक्युटर जनरल
  4.  फ्रांसमधील कौन्सिल ऑफ टेस्ट

उत्तर :स्कॅन्डीनेव्हियामधील अब्मुड्सन


 10. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो?

  1.  राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार
  2.  राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार  
  3.  उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून
  4.  संबंधित राज्याच्या राज्यपाल आपण होऊन

उत्तर :राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार


 11. जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केली तर त्या व्यक्तीचे तत्पूर्वी केलेले आहेश:

  1.  विधिअग्राह्य ठरतात
  2.  विधिग्राह्य राहतात.
  3.  विधिग्राह्य अथवा अग्राह्य सर्वोच्च न्यायालय ठरवते.
  4.  प्रकरण परत्वे ठरविल्या जाते.

उत्तर :विधिग्राह्य राहतात.


 12. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारी पहिली बिगर-भारतीय (अभारतीय) व्यक्ति कोण?

  1.  मार्टिन ल्युथर किंग
  2.  मदर तेरेसा
  3.  खान अब्दुल गफार खान
  4.  दलाई लामा

उत्तर :खान अब्दुल गफार खान


 13. खालीलपैकी कोणती व्यक्ति, संस्था, चळवळी संबंधी सन 2012-2013 मध्ये शताब्दी नव्हती?

  1.  सहकार चळवळ
  2.  यशवंतराव चव्हाण
  3.  मुंबई उच्च न्ययालय
  4.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग

उत्तर :महाराष्ट्र लोकसेवा आयोग


 14. रिकामी जागा योग्य शब्दाने भरा.

एका शासकीय नोकरास लाख घेताना पकडण्यास्तव तयार केलेल्या सापळ्यात फेनॉफथेलीन पावडर लावलेल्या नोटा वापरल्या गेल्या. गुन्ह्यासाठी पुरावा म्हणून त्यावर शिंपडलेले सोडीयम कार्बोनेट —– रंगाचे व्हावयास हवे.

  1.  निळे
  2.  जांभळे
  3.  लाल
  4.  काळे

उत्तर : जांभळे


15. जगातील सर्वात लोकप्रिय गुप्तहेर-जेम्स बॉन्ड!

खालीलपैकी कोणी आतापावेतो जेम्स बॉन्ड चा रोल केलेला नाही?

  1.  सीन कॉनरी
  2.  पिअर्स ब्रोसनन
  3.  डेनीअल क्रेग
  4.  ओमर शरीफ

उत्तर :ओमर शरीफ


16. सन 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात अधिक लोकसंख्या असलेली पाच शहरे त्यांच्या उतरत्या लोकसंख्येच्या क्रमात कोणती आहेत?

  1.  मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद
  2.  मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळूर
  3.  मुंबई, दिल्ली, बंगळूर, अहमदाबाद, हैद्राबाद
  4.  मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर, अहमदाबाद

उत्तर :मुंबई, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद


 17. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा निर्धारित कार्यकाळ :

  1.  सहा वर्षे
  2.  राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत
  3.  सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे, जे आधी असेल तो
  4.  पाच वर्षे किंवा वयाची 62 वर्ष, जे आधी असेल तो

उत्तर :सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे, जे आधी असेल तो


 18. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

  1.  आ.रा.ना.नि. कोणत्याही देशाला कर्ज देते
  2.  आ.रा.ना.नि. फक्त विकसित देशांना कर्ज देते.
  3.  आ.रा.ना.नि. फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देते.
  4.  आ.रा.ना.नि. फक्त राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकेस कर्ज देते.

उत्तर :आ.रा.ना.नि. फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देते.


 19. कोणत्या शहराला ‘अरबी समुद्राची राणी’ (क्वीन ऑफ अरेबियन सी) म्हटले जाते?

  1.  मुंबई
  2.  कोचीन
  3.  पोरबंदर
  4.  पनमबुर

उत्तर : कोचीन


 20. खालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम ‘सेझ’ विषयक धोरण रद्द केले?

  1.  गुजरात
  2.  पश्चिम बंगाल
  3.  महाराष्ट्र
  4.  गोवा

उत्तर :गोवा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.