4 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

जोगिंदर शर्मा
जोगिंदर शर्मा

4 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 फेब्रुवारी 2023)

राज्यातील सर्व शाळांमध्ये साजरा होणार आजी आजोबा दिवस:

  • मुलांच्या आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्याकरिता राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
  • रविवार 10 सप्टेंबर रोजी असलेला हा दिवस त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी जिल्हास्तर, राज्यस्तर तसेच शाळास्तरावर राबविण्यात येणार आहे.
  • काही कारणास्तव शाळेला सदर कार्यक्रमाचे आयोजन न करता आल्यास शाळेकडून आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, यासंदर्भात शासनाने परिपत्रकदेखील जारी केले आहे.

सरकारी नोकर भरतीत EWS अंतर्गत संधी नाही:

  • महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात (MAT) ने गुरूवारी डिसेंबर 2020 चा राज्य सरकारचा ठराव बेकायदेशीर ठरवला आहे.
  • त्यामुळे मॅटने आर्थिक दृष्ट्या दुर्बल मराठा तरूणांना झटका दिला आहे.
  • सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभागातून अर्ज करण्याचा मध्यवर्ती पर्याय ज्या ठरावाद्वारे करण्यात आला होता तो ठराव रद्द करण्यात आला आहे.
  • सरकारी नोकर भरतीत मराठा उमेदवारांना मराठा आरक्षण कायद्याच्या अंतर्गत जागा राखीव करून संधी दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली.
  • एवढंच नाही तर नंतर तो कायदाही रद्द केला.
  • त्यानंतर उमेदवार भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) आरक्षणाची संधी पूर्वलक्ष्यी प्रभावाने खुली करण्याचा राज्य सरकारचा 2020 मधला निर्णय बेकायदा आहे असं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने गुरुवारी म्हटलं आहे.
  • भविष्यातील सरकारी नोकर भरतींमध्ये मराठा समाजातील पात्र उमेदवारांना राज्य घटनेच्या अनुच्छेद १४, १६(४) आणि १६(६) अन्वये असलेल्या तरतुदींप्रमाणे EWS चे आरक्षण खुले असले पाहिजे असंही मॅटच्या अध्यक्ष न्या. मृदुला भाटकर आणि सदस्य मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या लवकरच नियुक्त्या:

  • सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाच न्यायमूर्तीची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यासाठी केलेली शिफारस लवकरच मंजूर केली जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाला दिले.
  • न्यायमूर्ती एस. के. कौल व न्यायमूर्ती अभय ओक यांच्या पीठाला महाधिवक्ता आर. वेंकटरामाणी यांनी या पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीचे लेखी आदेश लवकरच निघण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
  • न्यायवृंदाने गेल्या वर्षी 13 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीची शिफारस केली होती. यामध्ये राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पंकज मित्तल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. व्ही. संजयकुमार, पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश आहे.
  • नंतर 31 जानेवारी रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील न्यायवृंदाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल व गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या नावाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायामूर्तीपदी बढतीसाठी केंद्राकडे शिफारस केली.
  • सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायमूर्तीची मंजूर संख्या आहे.
  • सध्या सर्वोच्च न्यायालयात 27 न्यायमूर्ती कार्यरत आहेत.

जोगिंदर शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:

  • भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 साली टी-20 विश्वचषक जिंकला होता.
  • त्या विश्वचषकात फायनलचा हिरो जोगिंदर शर्मा ठरला होता.
  • या जोगिंदर शर्माने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
  • शुक्रवारी जोगिंदर शर्मा यांनी ट्विटरवर निवृत्तीची घोषणा केली.
  • हरियाणातील रोहतक येथून आलेल्या जोगिंदर शर्माने भारतासाठी फक्त 4 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत.
  • विशेष म्हणजे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्व टी-20 सामने केवळ विश्वचषकात खेळले आणि इतिहास रचला.

दिनविशेष:

  • 4 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला होता.
  • सन 1944 मध्ये चलो दिल्ली चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच केली होती.
  • श्रीलंका देशाला सन 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
  • सन 2004 मध्ये मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.