Rajyaseva Pre-Exam Question Set 15

Rajyaseva Pre-Exam Question Set 15

10 जून 2012 प्रश्नसंच 2 :

1. नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत?

  1.  कवि ग्रेस
  2.  बाल गंधर्व
  3.  कुमार गंधर्व
  4.  छोटा गंधर्व

उत्तर :कुमार गंधर्व


 2. खालीलपैकी कोणते (2002-07) आयात-निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य नाही?

  1.  कृषी निर्यातीवरील निर्बंध उठविणे
  2.  लघुउद्योग व कुटीरउद्योग निर्यातीस प्रोत्साहन
  3.  आयात पर्यायीकरण
  4.  विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास

उत्तर : विशेष आर्थिक क्षेत्राचा विकास


3. 1991 ची नरसिंहम समिती कशाशी संबंधित होती?

  1.  दारिद्र्य
  2.  आयात निर्यात धोरण
  3.  बँकेची वित्तीय व्यवस्था
  4.  बेरोजगार

उत्तर : बँकेची वित्तीय व्यवस्था


4. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो?

  1.  मौद्रिक धोरणात बदल
  2.  आयात शुल्कात कपात
  3.  सार्वजनिक वितरण व्यवस्था
  4.  वरील सर्व

उत्तर :सार्वजनिक वितरण व्यवस्था


5. प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते?

  1.  1974-75
  2.  2001-02
  3.  2009-10
  4.  2010-11

उत्तर :1974-75


6. खालीलपैकी कोणते विदेशी व्यापार धोरण 2009-2014 चे उद्दिष्ट नाही?

  1.  निर्यातीचा खालावणारा कल पूर्वपदावर आणणे
  2.  वार्षिक 15 टक्के निर्यात वृद्धी साध्य करणे
  3.  भारताचा जागतिक व्यापरातील हिस्सा 2020 पर्यंत दुप्पट करणे
  4.  चैनीच्या उपभोग्य वस्तूंची आयात वाढवणे

उत्तर :चैनीच्या उपभोग्य वस्तूंची आयात वाढवणे


7. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला?

  1.  सर्व धर्म समभाव
  2.  अलिप्ततावाद
  3.  पंचशील
  4.  निशस्त्रीकरण

उत्तर : पंचशील


8. ‘बहिष्कार हे अस्त्र परकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे’, असे कोणाचे मत होते?

  1.  महादेव गोविंद रानडे
  2.  गोपाळ कृष्ण गोखले
  3.  फिरोझशहा मेहता
  4.  दादाभाई नौरोजी

उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले


9. हिन्दी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्टयास काय नाव आहे?

  1.  अंतर-उष्णकटिबंधीय केंद्री भवन पट्टा
  2.  पश्चिमी जेटस्ट्रीम
  3.  विषुववृत्तीय कमी दाब पट्टा
  4.  यापैकी नाही

उत्तर : अंतर-उष्णकटिबंधीय केंद्री भवन पट्टा


10. सप्टेंबर 2010 मध्ये पहिला ‘आधार’ क्रमांक (7824 7431 7884) एका आदिवासी गावातील महिलेला प्रदान करण्यात आला, त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?

  1.  छत्तीसगढ
  2.  झारखंड
  3.  ओडिशा
  4.  महाराष्ट्र

उत्तर : महाराष्ट्र


11. तगनम, जगनम, धगनम आणि सम्मीश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी निगडीत आहेत?

  1.  भरतनाटयम
  2.  कथ्थक
  3.  कुचीपुडी
  4.  मोहिनी अट्टम

उत्तर : मोहिनी अट्टम


12. राष्ट्रीय संघ (UN) चा 193 वा सदस्य कोणता?

  1.  उत्तर सुदान
  2.  दक्षिण सुदान
  3.  झिंबाम्बे
  4.  झांबिया

उत्तर : दक्षिण सुदान


13. प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन वाजता दोन टोल याप्रमाणे, तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?

  1.  154
  2.  156
  3.  158
  4.  152

उत्तर : 156


14. फेमा, 1999 चे उद्दिष्ट कोणते?

  1.  विदेशी पर्यटकांना प्रबंध
  2.  आयात नियंत्रण
  3.  अनिवासी भारतीय गुंतवणुकीवर प्रबंध
  4.  बहिर्गत व्यापार व देय यांची सोय

उत्तर : बहिर्गत व्यापार व देय यांची सोय


15. प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्वाची अडचण कोणती?

  1.  वसुलीचा प्रश्न
  2.  खेळत्या भांडवलाचा प्रश्न
  3.  ग्राहकांची अशिक्षितता
  4.  अपुरा कर्मचारी वर्ग

उत्तर : वसुलीचा प्रश्न


16. वाळूमिश्रित ‘लोम’ प्रकाराची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते?

  1.  ज्वारी
  2.  नाचणी
  3.  तांदूळ
  4.  चहा

उत्तर : तांदूळ


17. महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?

  1.  तहसीलदार
  2.  ग्रामसेवक
  3.  तलाठी
  4.  पोलीस पाटील

उत्तर : तलाठी


18. भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या स्पर्धेचे तत्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले?

  1.  रेग्युलेटिंग अॅक्ट 1773
  2.  चार्टर अॅक्ट 1833
  3.  चार्टर अॅक्ट 1853
  4.  इंडियन कौन्सिल अॅक्ट 1861

उत्तर :चार्टर अॅक्ट 1853


19. भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मुलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे?

  1.  फ्रांस
  2.  यू.एस.ए.
  3.  यू.एस.एस.आर.
  4.  यू.के.

उत्तर :यू.एस.एस.आर.


20. रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे, अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे. तर अक्षयने 1 तास 18 मिनिटांत कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल?

  1.  13 मिनिटे
  2.  26 मिनिटे
  3.  36 मिनिटे
  4.  2 तास 36 मिनिटे

 उत्तर : 26 मिनिटे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.