Current Affairs (चालू घडामोडी) of 21 January 2015 For MPSC Exams

Current Affairs of 21 January 2015 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. निहलानी सेन्सॉरचे अध्यक्ष
2. भारतीयाला मानाचा पुरस्कार
3. ‘मिठी’ होणार मुक्त
4. जगात विश्र्वासू देशात भारत दुसरा
5. जन धन योजनेची गिनीजमध्ये नोंद
6. दिनविशेष 

 

 

 

 

निहलानी सेन्सॉरचे अध्यक्ष :

  • लीला सॅमसन यांनी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पहलाज निहलाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सरकारने बोर्डाचे पुनर्गठन करीत अन्य नऊ सदस्यांची नियुक्ती केले आहे.

भारतीयाला मानाचा पुरस्कार :

  • प्रसिद्ध भारतीय-अमेरिकी उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते फ्रँन्क इस्लाम यांना मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • आजमगढ येथे जन्मलेल्या इस्लाम यांना स्वप्ने जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या मोहिमेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘मिठी’ होणार मुक्त :

  • मिठी नदीच्या काठावरील 1800 अनाधिकृत बांधकामे एप्रिल महिन्याच्या अखेर पाडण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना दिला.
  • परिसरात झोपड्या उभ्या करणार्‍या विकासकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही कदम यांनी दिले.

जगात विश्र्वासू देशात भारत दुसरा :

  • जगामध्ये विश्र्वासू व जबाबदार देशांमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे.
  • स्विस रिसॉर्टने तयार केलेल्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • स्विस रिसॉर्टने सन 2015 साठी जगातील सर्वात विश्र्वासू व जबाबदार असणार्‍या 27 देशांचे सर्व्हेक्षण केले आहे.
  • युएई, भारत, चीन, नेदरलँड असे पहिले चार विश्र्वासू देश आहेत.

जन धन योजनेची गिनीजमध्ये नोंद :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जन धन योजनेची गिनीज बूक मध्ये नोंद झाली आहे.
  • गिनीज बूकच्या अधिकार्‍यानी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे आज प्रमाणपत्र प्रदान केले आहे.
  • मोदींनी सुरू केलेल्या जन धन योजनेमुळे 11.5 कोटी नागरिकांनी बँकामध्ये खाती उघडली आहे.
  • कमी वेळेमध्ये एवढ्या प्रमाणात खाती उघडली गेल्याची दखल गिनीज बूकने घेतली असून,तशी नोंद करण्यात आली.
  • 28 ऑगस्ट 2014 – 26 जानेवारी 2015 पर्यंत साडेसात कोटी खाती उघडण्याचे ध्येय ठेवण्यात आले होते.

दिनविशेष :

  • 1846‘डेली न्यूज’चा पहिला अंक डिकन्सच्या संपादनाखाली प्रसिद्ध झाला.
  • 1972 माणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्यांचा दर्जा मिळाला.
  • 2003राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अपमान करणार्‍यावर कठोर शिक्षेचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.