Current Affairs of 9 April 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (9 एप्रिल 2016)
रेल्वे विभागात पुणे सुपरफास्ट :
- मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये 1 हजार 154 कोटींचे उत्पादन मिळाले आहे.
- तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 137 कोटींने रेल्वेच्या उत्पान्नात वाढ झाली आहे.
- 2015-16 या आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न 6 टक्के अधिक आहे.
- मागील वर्षी पुणे विभागाला 1 हजार 17 कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
- तसेच गेल्या काही वर्षापासून पुणे विभागाने प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतुकीमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावलेली आहे.
- 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये 2.2 मेट्रिक टन माल वाहतुकीद्वारे सुमारे 328.81 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
Must Read (नक्की वाचा):
बीपीआरच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर :
- महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी मीरा सी. बोरवणकर यांची (दि.8) पोलीस संशोधन आणि विकास (बीपीआर अॅन्ड डी) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- तसेच त्या 1981 च्या तुकडीतील पोलीस अधिकारी आहेत.
- मुंबई गुन्हेशाखेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अखत्यारितील कार्मिक विभागाने बोरवणकर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
- पदभार स्वीकारतील त्या दिवसांपासून 30 सप्टेंबर 2017 रोजी निवृत्त होईपर्यंत त्या पदभार सांभाळतील.
- बोरवणकर यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाने ठेवल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीसंबंधी समितीने त्याला मंजुरी दिली.
11 व 12 एप्रिलला राष्ट्रीय परिषद होणार :
- यंदाच्या वर्षातील खरीप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी दिल्लीत 11 व 12 एप्रिलला दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद होणार आहे.
- गेल्या काही महिन्यांतील अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ यांसारख्या आपत्तींमुळे शेतीचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर खरिपावरील ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे.
- गेल्या वर्षी नैर्ऋत्य मॉन्सूनने पुरेशी साथ दिली नव्हती, त्यामुळे देशभरात पावसाचे प्रमाण 14 टक्क्यांनी घटले होते, परिणामी, 2015-16 च्या रब्बी हंगामातही मॉन्सूनंतर हिवाळ्यात अल्प पाऊस झाला.
- या पार्श्वभूमीवर खरिप अभियानासाठी निर्णायक ठरणाऱ्या कृषी, फलोत्पादन, पशू आणि दुग्धविकास, पतपुरवठा, सहकार आणि विपणन शेतीशी संबंधित प्रमुख खात्यांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील.
- तसेच त्यात नैसर्गिक आपत्ती, सरकारची मदत, बी-बियाणे, खते, शेतीमालाचा बाजारभाव यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन 2016 साठीची खरिपाची मोहीम राबविली जाणार आहे.
- आगामी सहा वर्षांत शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याची केलेली घोषणा पाहता त्यासाठी यंदाची खरीप मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
- परिषदेत कृषीशी संबंधित चारही क्षेत्रांशी निगडित तेरा गटचर्चाही होतील.
- प्रत्येक क्षेत्राबाबत यातून पुढे येणाऱ्या शिफारशींना परिषदेच्या समारोपाच्या दिवशी अंतिम रूप दिले जाईल.
इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्राला सुरुवात :
- इंडियन प्रीमियर लीगच्या नवव्या सत्रातील सलामीच्या सामन्याच्या आयोजनासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर वानखेडे स्टेडियम (दि.9) होणाऱ्या लढतीसाठी सज्ज झाले आहे.
- गतविजेते मुंबई इंडियन्स आणि नव्यानेच स्पर्धेत खेळत असलेल्या राइजिंग पुणे सुपरजायंटस् यांच्यातील लढतीने आयपीएलच्या नवव्या सत्राला सुरुवात होईल.
- आयपीएल स्पर्धा इतिहासातील माजी विजेते आणि बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर लादलेल्या दोन वर्षांच्या बंदीनंतर राइजिंग पुणे सुपरजायंटस् आणि गुजरात लायन्स या दोन संघांची स्पर्धेत एन्ट्री झाली.
- पुणेकरांकडे आयपीएलमधील सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाच्या प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आहेत.
- तसेच दुसरीकडे यजमान व गतविजेत्या मुंबई इंडियन्सची धुरा धडाकेबाज रोहित शर्माकडे असून ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंग संघाच्या प्रशिक्षकपदी आहे.
भारतीय भूदलाची सैनिकांना विशेष प्रशिक्षण :
- भारतीय भूदलाची तैनाती सध्या दोन विभागांत होते, शांतता क्षेत्र आणि युद्धक्षेत्र.
- देशाच्या अंतर्गत भागांतील लष्करी छावण्यांना शांतता क्षेत्र, तर जम्मू- काश्मीर, सियाचीनसारख्या अस्वस्थ सीमांना युद्धक्षेत्र म्हणण्यात येते.
- जवानापासून ते उच्च पदाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाला तीन वर्षे युद्धक्षेत्रात आणि तीन वर्षे शांतता क्षेत्रात तैनात करण्यात येते.
- मात्र युद्धक्षेत्रात तैनातीपूर्वी प्रत्येक सैनिकाला विशेष प्रशिक्षण देण्यात येते.
- शांतता क्षेत्रातून आलेल्या सैनिकाला सीमेवर उभे राहण्यासाठी शारीरिक आणि मानिसकदृष्ट्या तयार करण्याचे काम ‘बॅटल स्कूल’मध्ये करण्यात येते.
- त्या-त्या भागातील सीमेवरील समस्या आणि आव्हानांची माहिती करून देत जवानांना तेथील भूगोल आणि वातावरणासाठी तयार केले जाते.
- लष्कराच्या साउदन कमांडमध्ये अशी चार बॅटल स्कूल आहेत.
- दोन्ही खांद्यांचा वापर करून बंदूक चालविणे, अचूक लक्ष्यभेद करणे, अडथळ्यांची शर्यत आदी अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्या जातात.
- प्रत्येक येथे प्रत्येक जवानाची वैद्यकीय चाचणी केली जाते.
- तसेच मानसशास्त्रतज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन करण्यात येते, यात उत्तीर्ण होणाऱ्यांनाच पुढे सीमेवर तैनात केले जाते.
मुंबईत होणार ब्रिक्सची परिषद :
- ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांची संघटना असलेल्या ‘ब्रिक्स’ची तीन दिवसांची परिषद 14 ते 16 एप्रिल दरम्यान मुंबईत होत आहे.
- ब्रिक्स देशांचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर भारतात होत असलेली ही पहिलीच परिषद असेल.
- तसेच शहर विकास ही या परिषदेची मूळ संकल्पना आहे.
- नागरी वाहतूक, पायाभूत सुविधांसाठीचे वित्तीय व्यवस्थापन, शाश्वत शहरे, परिणामकारक जनसुविधा पुरविणे, परवडणारी घरे, जमिनींचा परिणामकारक वापर या विषयांवर परिषदेत व्यापक चर्चा होईल.
- तसेच विविध देशांचे प्रतिनिधी आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करतील.
- 14 तारखेला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल.
- पाचही देशांमधील गव्हर्नर, मंत्री, महापौर आणि वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी होणार आहेत.
- अमृत शहरे म्हणून निवड झालेल्या देशातील 43 शहरांच्या आणि स्मार्ट सिटींच्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश असेल.
- मेक इन इंडियाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणूनही या परिषदेला महत्त्व असेल.
कर्नाटकात भाजपच्या प्रदेशाध्यपदी बी.एस. येडीयुरप्पा :
- भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यातील भाजपच्या प्रमुख पदांवर बदल केले आहेत.
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांनी नियुक्ती कर्नाटक भाजपच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती केली आहे.
- उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यपदी केशव प्रसाद मौर्य यांची निवड करण्यात आली आहे.
- तसेच याचबरोबर पंजाब, तेलंगना आणि अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी बदल करण्यात आले आहेत.
- पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी विजय सांपला, तेलंगनाच्या डॉ. को. लक्ष्मण आणि अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी तापिर गाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा सध्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी असून त्यांच्या जागी प्रल्हाद व्ही जोशी यांची वर्णी लागली आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा