Current Affairs (चालू घडामोडी) of 23 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | आता व्हॉटसअॅप कंप्युटरवर उपलब्ध |
2. | शिवस्मारकाच्या कृती समितीच्या अध्यक्षपदी विनायक मेटे |
3. | जपानमध्ये उभारणार आंबेडकरांचा पुतळा |
4. | दिनविशेष |
आता व्हॉटसअॅप कंप्युटरवर उपलब्ध :
- जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजींग अॅप असणारे व्हॉटसअॅप आता कंप्युटरवरुण वापरता येणार आहे.
- व्हॉटसअॅपची सुविधा सध्या गूगल क्रोम ब्राउसरवर वापरता येणार आहे.
- तर अॅप फ्लॅटफॉर्मवरील मर्यादेमुळे आयफोन युझर्सला ही सेवा वापरता येणार नसल्याचे व्हॉटसअॅपने स्पष्ट केले आहे.
शिवस्मारकाच्या कृती समितीच्या अध्यक्षपदी विनायक मेटे :
- अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मारकासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीच्या अध्यक्षपदी शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांची निवड शासनाने केली आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईलगतच्या अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.यासाठी शासनाने ही समिति नेमली आहे.
- या समितीत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव हे तीन सदस्य आहेत.
- 19 फेब्रुवारीपर्यंत या सर्व अनुषंगीक परवानग्या घेण्याचे काम ही समिति करणार आहे.
जपानमध्ये उभारणार आंबेडकरांचा पुतळा :
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जपानमधील ‘कोयासान‘ या बौद्ध केंद्रात उभारण्यात येणार आहे.
- महाराष्ट्रातील पर्यटनाचा जगभर प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळा‘ने पहिले अंतरराष्ट्रीय कार्यालय टोकियो येथे सुरू केले आहे.
- 6 फुट 2 इंच इतकी याची ऊंची आहे.
- पुतळ्याचे अर्धे काम पूर्ण झालेले असून मार्च अखेरपर्यंत त्याचे काम पूर्ण होईल.
दिनविशेष :
- 1897 – नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म.
- 1932 – प्रभात फिल्म कंपनीचा ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटाची हिन्दी आवृत्ती मुंबईत प्रदर्शित झाली.
- 1911 – जॅक्सन खुनप्रकरणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर दूसरा खटला सुरू.
- 1926 – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म.