संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संस्था
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संस्था
1. जागतिक अन्न व कृषी संघटना (IFO) :
- जागतिक अन्न कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली.
- या संघटनेची स्थापना सन 1945 मध्ये करण्यात आली आणि या संस्थेने कार्यालय रोम (ग्रीक) येथे आहे.
2. जागतिक अणुशक्ती अभिकरण (IAA) :
- जागतिक अणू कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे आणि शांततापूर्ण कार्यक्रमाकरिता अणुशक्ती कार्यक्रम राबविणे.
- या उद्देशाने संस्थेची सन 1957 मध्ये स्थापना करण्यात आली.
- या संस्थेचे कार्यालय व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आहे.
3. आंतरराष्ट्रीय विकास संघटना :
- जागतिक विकासाचा कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही सन 1960 मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली.
- या संस्थेचे कार्यालय वॉशिंग्टन (अमेरिका) येथे आहे.
4. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) :
- जागतिक कामगाराचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने सन 1919 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
- या संघटनेचे कार्यालय जिनिव्हा (स्वत्झर्लंड) येथे आहे.
5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) :
- आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने सन 1945 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली.
- ही संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद राष्ट्रांकडून मिळणार्या वर्गणीतून आपले भांडवल उभे करते आणि सभासद राष्ट्रांना अडचणीच्या वेळी अल्प मुदतीचे कर्ज देऊन आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल साधण्यास मदत करते.
- या संस्थेचे कार्यालय वॉशिंग्टन (अमेरिका) येथे आहे.
6. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, शास्त्रीय अनई सांस्कृतिक संघटना (UNESCO) :
- जागतिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1946 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
- या संघटनेचे कार्यालय पॅरिस (फ्रान्स) येथे आहे.
7. जागतिक आरोग्य संघटना (WHO) :
- जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना करण्यात आली.
- या संघटनेचे कार्यालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.
8. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय बालकासाठीचा अनुशासन निधी (UNICEF) :
- बालकांच्या सर्वागिण विकासाकरिता जागतिक स्तरावर कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1946 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली.
- या संघटनेचे कार्यालय न्यूयॉर्क (अमेरिका) येथे आहे.
9. संयुक्त राष्ट्र औधोगिक विकास संघटना (UNIDO) :
- विकसनशील राष्ट्रांना औधोगिककरणास मदत करणे व संयुक्त राष्ट्र संघटनेच्या औधोगिक प्रोत्साहन कार्यक्रमाचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने सन 1967 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली.
- या संघटनेचे कार्यालय व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) आहे.
10. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA) :
- जागतिक लोकसंख्या नियंत्रणाबाबत कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही संघटना सन 1967 स्थापन करण्यात आली.
- या संघटनेचे कार्यालय न्यूयॉर्क (अमेरिका) येथे आहे.
11. जागतिक व्यापर संघटना (WTO) :
- जागतिक व्यापारात सुसूत्रीकरण आणण्याच्या उद्देशाने सन 1995 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली.
- या संघटनेचे कार्यालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.
12. जागतिक बँक (WORLD BANK) :
- सन 1944 साली ब्रिटनवूड परिषदेतील निर्णयानुसार ही बँक सन 1945 मध्ये स्थापन करण्यात आली.
- जागतिक बँकेच्या सभासद राष्ट्रांना पुनर्रचना व विकासाच्या कार्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज देणे हा या बँक स्थापनेमागील महत्वाचा उद्देश आहे.
- या बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन (अमेरिका) येथे आहे.
13. इंटरपोल (INTERPOL) :
- आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांविरुद्धच्या कामात विविध राष्ट्रांतील पोलीस दलात परस्परांना सहकार्य व समन्वय साधण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
- स्थापना : सन 1923
- मुख्यालय : लेपान्स (लियोना)
14. रेडक्रॉस (REDCROSS) :
- युद्ध भूकंप, वादळ आणि आपत्कालीन स्थितीमध्ये शांतता व प्रस्तापित करणे आणि आपदग्रस्तांना मदत पोहचविण्याच्या उद्देशाने हेन्री ज्यूनाट यांनी ही संघटना स्थापन केली आहे.
- स्थापना : 1983
- मुख्यालय : जिनिव्हा. भारतात या संस्थेचे अध्यक्ष भारताचे तात्कालिन राष्ट्रपती असतात.
15. जागतिक मानवी हक्क संस्था (अॅम्नेस्टी इंटरनॅशनल) :
- ब्रिटिश वकील बिटर बेरेन्स यांनी पुढाकार घेवून मूलभूत मानवी हक्क अबाधित राहण्यासाठी झगडणारी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली.
- या संघटनेचे 160 हून अधिक देश सभासद आहेत.
- मानवी हक्क प्रस्थापित करण्याकरीता ही संस्था कार्य करते.
- स्थापना : 18 मे 1961
- मुख्यालय : लंडन