ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ

ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ

  • ऑगस्ट 1940 मध्ये दुसर्‍या महायुद्धात काँग्रेसचे सहकार्य मिळविण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी एक घोषणा केली. त्यानुसार गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदी प्रतिनिधींचा समावेश व कार्यकारी मंडळाचा विस्तार करण्याची आश्वासने दिली होती.
  • ऑगस्ट घोषणेत-युद्धानंतर स्वातंत्र्य देणे, गव्हर्नर जनरलच्या अनिर्बंध सत्तेवर नियंत्रणे घालणे, वसाहतीच्या स्वराज्याचे स्पष्ट आश्वासन देणे इ. गोष्टीचा समावेश नसल्याने काँग्रेसने हि योजना फेटाळली.
  • ऑक्टोबर 1940 मध्ये म.गांधीजीच्या आदेशानुसार वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू झाली.
  • वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही-विनोबा भावे, दुसरे पं. नेहरू होते.

 क्रिप्स योजना :

  • मार्च 1942 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांनी भारतमंत्री सर स्ट्रफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन भारतात पाठविले.
  • 21 मार्च 1942 रोजी क्रिप्स योजना जाहीर करण्यात आली.
  • युद्ध संपल्यानंतर भारताला वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा देण्याची तरतूद या योजनेत होती.
  • क्रिप्स योजना काँग्रेससह सर्वच पक्षांनी फेटाळून लावली.
  • गांधीजीनी क्रिप्स योजनेला ‘बुडत्या बॅकेचा पुढील तारखेचा चेक’ अशी उपाधी दिली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.