STI Pre Exam Question Set 15
STI Pre Exam Question Set 15
1. एका विद्युत इस्त्रीचा रोध 20Ω आहे. जर तीच्यातून 1A विद्युतधारा पाठविली तर, 1 मिनिटात किती ज्यूल उष्णता निर्माण होईल?
- 1200
- 285.7
- 20
- 120
उत्तर : 1200
2. राजर्षी शाहू महाराजांनी विधवांचा पुनर्विवाहास मान्यता देणारा कायदा ——- यावर्षी आपल्या राज्यात आणला.
- इ.स. 1916
- इ.स. 1917
- इ.स. 1918
- इ.स. 1919
उत्तर : इ.स. 1917
3. ईशान्य मोसमी वार्यांमुळे —— राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.
- तामीळनाडू
- महाराष्ट्र
- पंजाब
- गोवा
उत्तर : तामीळनाडू
4. छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 रोजी काढलेल्या वटहुकमाव्दारे कोणती पद्धती बंद केली?
- जातवार वसतिगृह
- महार वतन
- सवर्णासाठी स्वतंत्र पाणवठे
- हुंडापद्धती
उत्तर : महार वतन
5. —— हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते.
- ए.ओ. ह्युम
- सुरेन्द्रनाथ बॅनर्जी
- लॉर्ड डफरीन
- लॉर्ड रिपन
उत्तर : ए.ओ. ह्युम
6. भारतातील हिमालय पर्वत हा —— प्रकारचा पर्वत आहे.
- अवशिष्ट पर्वत
- ठोकळ्याचा पर्वत
- घडीचा पर्वत
- ज्वालामुखी
उत्तर : घडीचा पर्वत
7. एका संख्येत तिची निमपट मिळवल्यास 123 मिळतात. तर ती संख्या —–
- 72
- 84
- 82
- 70
उत्तर : 82
8. खालीलपैकी कोणता वृक्ष उष्ण कटीबंधिय सदाहरित जंगलामध्ये आढळतो?
- अंजन
- महोगनी
- पिंपळ
- पळस
उत्तर : अंजन
9. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करतात?
- राष्ट्रपती
- राज्यपाल
- पंतप्रधान
- कॅबिनेट मंत्री
उत्तर : राज्यपाल
10. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म कोणत्या वर्षी झाला?
- इ.स. 1855
- इ.स. 1856
- इ.स. 1857
- इ.स. 1858
उत्तर : इ.स. 1856
11. 2008 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
- डॉ. अरुण निगवेकर
- डॉ. नरेंद्र जाधव
- डॉ. सुखदेव थोरात
- डॉ. विजय खोले
उत्तर : डॉ. सुखदेव थोरात
12. ‘आगा खान कप’ —– या खेळाशी संबंधित आहे.
- फुटबॉल
- बॅडमिंटन
- हॉकी
- क्रिकेट
उत्तर : हॉकी
13. संसदेत महिलांना किती टक्के जागा राखीव असाव्यात अशी मागणी करण्यात येते?
- 35
- 45
- 33
- 30
उत्तर : 33
14. 5 वी पंचवार्षिक योजना —– या वर्षी थांबविण्यात आली.
- 1977
- 1975
- 1978
- 1980
उत्तर : 1978
15. कशाच्या अभावाने पेलाग्रा होतो?
- नियासिन
- थायमिन
- रेटीनॉट
- अॅस्कॉर्बिक आम्ल
उत्तर : नियासिन
16. अभिनव बिंद्रा हा प्रसिद्ध —– आहे.
- समाज सेवक
- अभिनेता
- खेळाडू
- पत्रकार
उत्तर : खेळाडू
17. कांदा ही —— वनस्पती आहे.
- एकबिजपत्री
- व्दिबिजपत्री
- अनावृतबिज
- नेचोदभिदी
उत्तर : एकबिजपत्री
18. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक —– आहे.
- मीटर/से.
- वॉट
- डेसिबल
- हर्त्झ
उत्तर : डेसिबल
19. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सर्वप्रथम या देशात झाली?
- अमेरिका (यू.एस.एस.)
- कॅनडा
- दक्षिण आफ्रिका
- ब्रिटन
उत्तर : दक्षिण आफ्रिका
20. कोतवालाची नेमणूक कोण करतो?
- मुख्यमंत्री
- सरपंच
- तहसीलदार
- गटविकास अधिकारी
उत्तर : तहसीलदार