Current Affairs of 11 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (11 मे 2016)
शशांक मनोहर यांनी दिला BCCI चा राजीनामा :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- मनोहर यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार आणि अजय शिर्के यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा येण्याची शक्यता आहे.
- नव्या नियमांनुसार ICC च्या अध्यक्षपदावर असणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रीय वा राज्यस्तरीय क्रिकेट संघटनेच्या पदावर राहता येणार नाही.
- मे महिना अखेरीपर्यंत नवे अध्यक्ष निवडले जातील.
- मनोहर हे BCCI आणि ICC या दोन्ही संघटनांचे अध्यक्षपद बजावत होते, त्यामुळे त्यांनी भारतीय संघटनेच्या राजीनामा दिला.
- तसेच त्यामुळे ICC च्या अध्यक्षदावर पुन्हा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- मनोहर हे दुसऱ्यांदा ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
Must Read (नक्की वाचा):
दिल्लीत होणार क्षेपणास्त्ररोधक यंत्रणा :
- शत्रूच्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी राजधानी दिल्लीत क्षेपणास्त्ररोधक यंत्रणा (मिसाइल शील्ड) पुढील वर्षी कार्यान्वित होईल, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकसभेत दिली.
- रशियाकडून मिळणारी ‘मिसाइल शील्ड’ यंत्रणेची प्रतीक्षा भारत करीत आहे.
- जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या लांब पल्ल्याची ‘एस-400 एलआरएसएएम’ची पाच क्षेपणास्त्रे हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
- तेराव्या पंचवार्षिक योजनेत म्हणजे 2017-22 या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- लष्करी संपादन मंडळाची बैठक गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. त्या वेळी ही क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- ‘एस- 300’पेक्षा ‘एस-400’प्रणालीमध्ये काय फरक आहे, या प्रश्नाला उत्तर देताना पर्रीकर म्हणाले की, जास्त व कमी पल्ल्याच्या लक्ष्यासंदर्भात जुन्या प्रणालीची कामगिरी नव्यापेक्षा चांगली होती.
यूपीएससीमध्ये योगेश कुंभेजकर राज्यात प्रथम :
- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 2015 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
- दिल्लीची टीना दाबी ही देशात प्रथम आली असून, सोलापूरच्या योगेश कुंभेजकर याने राज्यात प्रथम तर देशात आठवा क्रमांक मिळविला.
- राज्यातील 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे.
- श्रीकृष्णनाथ पांचाळ याने राज्यात दुसरा आणि देशात 16 वा क्रमांक मिळवला, तर सौरभ गहरवार याने राज्यात तिसरा आणि देशात 46 वा क्रमांक मिळविला आहे.
- यूपीएससीतर्फे 2015 च्या परीक्षेत यश संपादन केलेल्या 1 हजार 78 उमेदवारांची यादी (दि.10) जाहीर करण्यात आली.
- तसेच या उमेदवारांची इंडियन अॅडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ‘ए’ आणि ग्रुप ‘बी’ या पदांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
- दरवर्षी राज्यातील सुमारे 8 ते 10 टक्के विद्यार्थी यूपीएससीमध्ये यश संपादन करतात. यंदाही 10 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
पृथ्वीच्या आकाराचे आणखी 100 ग्रह :
- आकाशगंगेमध्ये पृथ्वीच्या आकाराचे 100 पेक्षा अधिक ग्रह असलेल्याचा शोध अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने लावला आहे.
- नासाच्या केप्लर दुर्बिणीने पृथ्वीच्या आकाराएवढ्या शंभर ग्रहांचा शोध लावला आहे.
- तसेच या शोधामध्ये नासाने आपल्या सूर्यमालिके बाहेरील 1284 ग्रहांचा शोध लावला असून यामधील काही ग्रह अधिवासक्षम क्षेत्रात आहेत.
- यात 550 लहान ग्रह असून त्यापैकी काही ग्रह खडकाळ आहेत.
- आकाशगंगेतील अधिवासक्षम ग्रहांचा शोध घेत असून असे अब्जावधी ग्रह असण्याची शक्यता आहे, अशी माहिती केपलर प्रकल्पाच्या डॉ. नताली बताल्हा यांनी दिली.
- केप्लरच्या या नव्या शोधामुळे आकाशगंगेमध्ये अनेक छोटे ग्रह असल्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे शास्त्रज्ञ नताली बताल्हा यांनी सांगितले.
- मोठ्या ग्रहांच्या तुलनेत छोट्या ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता जास्त असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
गुगलतर्फे देशातील 5 रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा :
- देशातील पाच रेल्वेस्थानकांवर विनामुल्य हाय-स्पीड वायफाय सेवा सुरू करण्याची घोषणा गुगलतर्फे (दि.9) करण्यात आली.
- उज्जैन, जयपूर, पाटणा, गुवाहाटी आणि अलाहाबाद रेल्वेस्थानकांवर गुगलने ही सेवा सुरू केली.
- वर्षाखेरपर्यंत देशातील 100 रेल्वेस्थानकांवर विनामुल्य वायफाय सेवा सुरू करण्याची योजना असल्याचे गुगलने एका निवेदनाद्वारे जाहीर केले.
- वरील पाच स्थानकांवर सुरू करण्यात आलेली ही सुविधा याच योजनेचा भाग असून, लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या सुविधेचे लोकार्पण करतील.
- गुगलने आपल्या या सेवेसाठी भारतीय रेल्वेच्या रेलटेल या फायबर नेटवर्कचा वापर केला आहे.
- तसेच या पाच रेल्वे स्थानकांची भर पडताच देशभरातील 15 रेल्वेस्थानकांवर ही सेवा उपलब्ध असेल.
- मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील या सुविधेला येत असलेला चांगला प्रतिसाद पाहून कंपनी दादर, वांद्रे, चर्चगेट, ठाणे, कल्याण, पनवेल, वाशी, कुर्ला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, बोरिवली आणि इतर अनेक रेल्वेस्थानकांवर ही सेवा सुरू करणार आहे.
दिनविशेष :
- भारत राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन.
- मातृत्व दिन.
- 1888 : ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.
- 1920 : स्त्रियांना पदवीपरीक्षेसाठी प्रवेश देण्याचा ऑक्सफर्ड विद्यापिठाचा निर्णय.
- 1987 : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
- 1998 : भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (12 मे 2016)