Current Affairs (चालू घडामोडी) of 21 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | अखेर मोदींच्या सुटची विक्री |
2. | मृदा स्वास्थ्य योजना |
3. | गोविंद पानसरे यांचे निधन |
4. | तपन मिश्रा यांची ‘सॅक’च्या प्रमुखपदी नियुक्ती |
5. | दिनविशेष |
अखेर मोदींच्या सुटची विक्री :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटची आज विक्री झाली असून 4 कोटी 31 लाख रुपयांना तो विकण्यात आला.
- धर्मा नंदन समूहाचे मालक हितेन भाई पटेल यांनी हा सूट विकत घेतला आहे.
मृदा स्वास्थ्य योजना :
- शेतकर्यांसाठी सरकारने मृदा स्वास्थ्य योजना आणली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शेतकर्यांसाठी ‘मृदा स्वास्थ्य कार्ड‘ योजनेचे उद्घाटन केले.
- या योजनेत शेतजमिनीचे आरोग्य सांभाळले जाणार असून खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत बिघडू नये यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे.
- तीन वर्षात सुमारे 14 कोटी शेतकर्यांना या कार्डचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- या कार्डचा वापर जमिनीची तपासणी करण्यासाठी होईल.
गोविंद पानसरे यांचे निधन :
- कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मुंबईतील ब्रिचकॅँडी रुग्णालयात शुक्रवारी रात्री निधन झाले.
- पानसरे हे 81 वर्षांचे होते.
- 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.20 वाजता पानसरे यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलमधून पाच गोळ्या घातल्या.
तपन मिश्रा यांची ‘सॅक’च्या प्रमुखपदी नियुक्ती :
- प्रख्यात शास्त्रज्ञ तपन मिश्रा यांची अंतराळ संशोधन संस्थेच्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली.
- मिश्रा हे इस्त्रोच्या बंगळूर मुख्यालयातील ‘इनोव्हेशन्स मॅनेजमेंट‘ कार्यालयात प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
दिनविशेष :
- 21 फेब्रुवारी 2015 – मातृभाषा दिवस.
- 1894 – प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म.