Current Affairs (चालू घडामोडी) of 25 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | उपग्रहाचा वापर करून दिला जाणार पीक विमा |
2. | अयोध्येत बनणार राम मंदिर व मस्जिद |
3. | महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण |
4. | राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च रोजी |
5. | कुंबळे यांचा ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश |
6. | दिनविशेष |
उपग्रहाचा वापर करून दिला जाणार पीक विमा :
- उपग्रहाचा वापर करून पीकविमा देण्याची तयारी सरकारची सुरू आहे.
- आता देशातील सर्व शेतजमिनी डिजिटल नकाशावर दिसणार असून या सर्व डाटाचा वापर पीकविमा निश्चित करण्यासाठी केले जाणार आहे.
- देशातील शेतजमीनिचा आकार लहान असल्यामुळे उपग्रहाच्या आधारे अंदाज काढणे उपयुक्त ठरणार आहे.
- उपग्रहाच्या आधारे शेतीचा उत्पादन निर्देशांक ठरविला जाईल.
अयोध्येत बनणार राम मंदिर व मस्जिद :
- अयोध्या येथील वादग्रस्त भूमीवरुन सुरू असलेल्या वादावर तोडगा म्हणून त्या 70 एकरच्या या जागेवर राम मंदिर व मस्जिद दोन्ही बांधले जाईल आणि दोघांच्या मधोमध 100 फूट उंच भिंत बांधून या जागेचे विभाजन करण्यावर दोन्ही पक्षकारांचे एकमत झाले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडू असे महंत ज्ञान दास यांनी संगितले.
महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण :
- महात्मा गांधी यांच्या ब्रॉझच्या पुतळ्याचे येथील ब्रिटनच्या एतिहासिक पार्लमेंट स्क्वेअरमध्ये 14 मार्च रोजी अनावरण होणार आहे.
- पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी ही घोषणा केली.
- या कामासाठी ख्यातनाम पोलाद उत्पादक लक्ष्मी एन.मित्तल एक लाख पौंड दिले आहेत.
राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च रोजी :
- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्चपासून सुरू होत असून राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च रोजी मांडण्यात येणार आहे.
- अभय सभागृहाच्या 1 एप्रिलपर्यंतच्या कामकाजाला मंगळवारी मंजूरी देण्यात आली.
कुंबळे यांचा ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश :
- भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेचा रविवारी औपचारिकरित्या आंतरराष्ट्रीयक्रिकेट परिषदेच्या मानाचा ‘हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश करण्यात आला.
- क्रिकेट जगातील यादीत सामील होणार कुंबळे हा चौथा भारतीय तर 77वा खेळाडू आहे.
- जेष्ठ महिला क्रिकेटपटु बेटी विल्सन यांचाही या यादीत समावेश करण्यात आला.
दिनविशेष :
- 1510 – गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला.
- 1840 – मराठीतील बाल बड्मयाचे जनक विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म.