Current Affairs (चालू घडामोडी) of 26 February 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | कीर्ती शिलेदार, श्रीकांत मोघे यांना जीवनगौरव पुरस्कार |
2. | मिरासदार यांना ‘विंदा करंदीकर’ पुरस्कार |
3. | आज जाहीर होणार अर्थसंकल्प |
4. | एच-1बी जोडीदारास कामाची संधी |
5. | दिनविशेष |
कीर्ती शिलेदार, श्रीकांत मोघे यांना जीवनगौरव पुरस्कार :
- ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलावंत कीर्ती शिलेदार यांना या वर्षीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
- पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मिरासदार यांना ‘विंदा करंदीकर’ पुरस्कार :
- राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येणारा 2014 वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा.द.मा.मिरासदार यांना तर श्री.पु. भागवत पुरस्कार केशव भिकजी ढवळे प्रकाशन यांना जाहीर.
- मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले.
- पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे विंदा करंदीकर पुरस्काराचे स्वरूप आहे.
- तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे श्री.पु. भागवत पुरस्काराचे स्वरूप आहे.
आज जाहीर होणार अर्थसंकल्प :
- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आज दुपारी 12 वाजता अर्थसंकल्प जाहीर करणार.
एच-1बी जोडीदारास कामाची संधी :
- अमेरिकेने एच-1बी व्हिसाधारकांच्या जोडीदारास काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
- 26 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून या निर्णयामुळे अनेक भारतीयांना फायदा होणार आहे.
- सध्याच्या कायद्यानुसार एच-1बी व्हिसाधारकांना त्यांच्या जोडीदारास येथे काम करण्याची परवानगी नव्हती.
- अमेरिकेतील नागरिक आणि स्थलांतर सेवा अर्थात यूएससीआयएसव्दारे येत्या 26 मेपासून एच-1बी धारकांचे पाती-पत्नी यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहे.
दिनविशेष :
- 1972 – वर्ध्याजवळील अर्वी येथे विक्रम सराबाई अर्थ सॅटेलाइट स्टेशन राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
- 1974 – वी.स.खांडेकर यांना ‘ययाति’ कादंबरीसाठी ज्ञानपीठ परितोषिक प्रदान.
- 1984 – इन्सॅट-1 बी हा उपग्रह पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते राज्याला अर्पण.