राजकीय विचारवंत – दादाभाई नौरोजी
राजकीय विचारवंत – दादाभाई नौरोजी
दादाभाई नौरोजी (सन 1825 ते 1917) :-
- दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी गुजरातमधील नवसारी गावातील पारशी कुटूंबात झाला.
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. या कॉलेजमधील दादाभाई हे गणिताचे पहिले प्राध्यापक होय.
- त्यांनी जवळजवळ पाच तपे देशकार्य केले. यामुळेच दादाभाई नौरोजी भारतीय राजकाराणातील पितामह म्हणून ओळखले जातात.
- सन 1852 मध्ये नाना शंकरशेट व भाऊ दाजी लाड यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन या राजकीय संघटनेची स्थापना केली.
- भारतीय जनतेचे प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडता यावे म्हणून त्यांनी सन 1866 मध्ये इंग्लंड येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली.
- सन 1892 मध्ये त्यांना इंग्लंडच्या हुजूर पक्षामार्फत फिन्सबरी मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली. ते या वेळी प्रचंड मतांनी निवडून आले. ते हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून जाणारे पहिले भारतीय होय.
- सन 1885, 1892 व 1906 या तीन वेळा ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. सन 1906 च्या कलकत्ता येथील अधिवेशनाच्या अध्यक्षीय पदावरून बोलताना त्यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे हे जाहीर केले व स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.
- भारतीय जनतेच्या दारिद्रयास ब्रिटिश शासनच जबाबदार आहे असे त्यांनी पॉवर्टी अँड अॅन ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाने ग्रंथात सप्रमाण सिद्ध केले. या पुस्तकात मांडलेल्या सिद्धांतापैकी लुटीचा सिद्धांत महत्वाचा मानला जातो.
- दादाभाई नौरोजी हे भारतीय अर्थशास्त्राचा अभ्यास करून त्यावर विचार मांडणारे पहिले भारतीय होत. यामुळे त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात.