Current Affairs (चालू घडामोडी) of 17 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | सैफ अली खानचा पद्मश्री परत घेणार |
2. | बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र प्रथम |
3. | प्राथमिक शिक्षण मातृभाषेत |
4. | मोदींनी केलेत मॉरिशस सोबत पाच करार |
5. | मोदींचा शेतकर्यांशी संवाद |
6. | दिनविशेष |
सैफ अली खानचा पद्मश्री परत घेणार :
- मोदी सरकारने बॉलीवूडमधील अभिनेता सैफ आली खानचा पद्मश्री परत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
- अनिवासीत भारतीयाला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आणि गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तिला पुरस्कार देत येत नसल्याने पुरस्कार परत घेतल्या जावा अशी मागणी केली जात आहे.
- कला व मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 2010 मध्ये सैफ आली खानला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):
बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र प्रथम :
- महाराष्ट्र बलात्कार व विनयभंग घटनांमध्ये अव्वल स्थानावर असल्याची घटना उघडकीस आली आहे.
- महाराष्ट्राच्या पाठोपाठ मध्यप्रदेश तसेच आंध्रप्रदेश ह्या राज्यांचे क्रमांक आहेत.
- महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी आज लोकसभेत संगितले.
प्राथमिक शिक्षण मातृभाषेत :
- देशातील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव राष्ट्रीय लोकसेवा संघाच्या भारतीय प्रतींनिधी सभेत संमत करण्यात आला.
- केंद्र व राज्य शासनांनी भाषेविषयक धोरणाचा आढावा घ्यावा व प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची व्यवस्था करावी असे अहवान करण्यात आले.
मोदींनी केलेत मॉरिशस सोबत पाच करार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील प्रकल्पांसाठीकमी व्याजदरात पाच हजार कोटी डॉलरचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली असून त्यांनी मॉरिशस सोबत पाच करार केलेत.
- मॉरिशससोबतचे पाच करार –
- आंब्यांची आयात
- सांस्कृतिक सहकार्य करार
- बेटांचा विकास
- पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा सहकार्य
- सागरी व्यापारात वाढ
मोदींचा शेतकर्यांशी संवाद :
- आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत.
- 22 मार्चला पंतप्रधान मोदी ‘मन की बात मधून’ शेतकर्यांशी बोलणार आहेत.
दिनविशेष :
- 1955 – आयएसआय रेग्युलेशन 1955 अमलात आला.
- 1969 – गोल्डा मायर यांनी इस्त्राईलच्या पंतप्रधानपदाचा कारभार हाती घेतला.