Current Affairs (चालू घडामोडी) of 19 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | ‘ड्रोन’ आणि ‘लेझर गायडेड’ क्षेपणास्त्राची चाचणी |
2. | पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केले श्रीलंके सोबत चार करार |
3. | अरुण जेटली प्रदान करणार चौथे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार |
4. | तिकीटांवर छापणार हेल्पलाइन क्रमांक |
5. | महिलांसाठी सुरू होणार वेब पोर्टल सुविधा |
6. | महाराष्ट्रानंतर हरियानातही गोहत्या बंदी |
‘ड्रोन’ आणि ‘लेझर गायडेड’ क्षेपणास्त्राची चाचणी :
- ‘ड्रोन’ आणि ‘लेझर गायडेड’ क्षेपणास्त्राची चाचणी पाकिस्तानने घेतली हे क्षेपणास्त्र सर्व प्रकारच्या वातावरणात वापरता येणार आहे.
- कोणत्याही वातावरणात लक्ष्याचा भेद घेण्याची त्याची क्षमता असून ड्रोनचे नाव ‘बराक’ तर त्या क्षेपणास्त्राचे नाव ‘बर्फ’ आहे.
- ड्रोनच्या चाचणीच्या वेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ उपस्थित होते.
Must Read (नक्की वाचा):
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केले श्रीलंके सोबत चार करार :
- भारत आणि श्रीलंका यांच्यात रविद्रनाथ टागोर यांचे स्मारक उभारणे, व्हिसा, सीमाशुल्क, आणि युवककल्याण यांसारखे चार करार करण्यात आले.
- तसेच भारत श्रीलंकेतील रेल्वेच्या विकासासाठी भारत योगदान देईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
- भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेंट्रल बँक श्रीलंका यांच्यादरम्यान चलन हस्तांतराबाबद सामंजस्य करार करण्यात आला.
अरुण जेटली प्रदान करणार चौथे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार :
- माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली 20 मार्च रोजी चौथे राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान करणार आहेत.
- छायाचित्रण क्षेत्रातील असाधारण बुद्धिमत्तेचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात.
- वर्षातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार, व्यावसायिक आणि नावोदितांसाठी अशा विविध विभागांसाठी हे पुरस्कार दिले जातात.
तिकीटांवर छापणार हेल्पलाइन क्रमांक :
- रेल्वे तिकीटाच्या पुढील बाजूस 138 आणि 182 हे हेल्पलाइन क्रमांक छापण्यात येणार आहेत.
- प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जाहिरातीसाठी हेल्पलाइन क्रमांक छापले जाणार आहेत.
- तसेच वैद्यकीय मदत, स्वच्छता, खाद्यपदार्थ या संबंधीची चौकशी करण्यासाठी रेल्वे विभागणे हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केले आहेत.
महिलांसाठी सुरू होणार वेब पोर्टल सुविधा :
- महिला व अन्य दुर्बल गटांच्या सुरक्षेस सरकार लवकरच mysecurity.gov.in हे वेब पोर्टल सुरू करणार आहे.
- तसेच स्वयंसेवी संस्था, व्यक्ति, संस्था आदींनी विकसित या पोर्टलवर उपलब्ध असतील.
- मात्र या सर्वांसाठी पात्रता निकष पूर्ण केलेले असावेत.
महाराष्ट्रानंतर हरियानातही गोहत्या बंदी :
- महाराष्ट्रा पाठोपाठ हरियानातही गोहत्या बंदी करण्यात आली आहे.
- गोवंश संरक्षण आणि गोसंवर्धन विधेयक, 2015 हरियाणा सरकारने मंजूर केले.
- या कायद्याचे उल्लंघन करणार्याला तीन वर्षाची शिक्षा तसेच 30,000 ते 1 लाख रुपयापर्यंत दंड ठोठवण्यात येणार आहे.
- तर गोवंशाची निर्यात करणार्याला किमान तीन वर्ष तर कमाल सात वर्षाची शिक्षा तसेच 30,000 ते 1 लाख रुपये दंड असणार आहे.