Current Affairs (चालू घडामोडी) of 23 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | राजेंद्र सिंह यांना पाणी पुरस्कार घोषित |
2. | 317 कोटींचा खर्च मोदींच्या प्रदेशदौर्यावर |
3. | आता सातही दिवस दुकाने खुली |
4. | पाठवा पैसे आता फेसबूक मेसेंजरवरूनही |
5. | नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविणार |
6. | रामकृष्णन होणार रॉयल सोसायटीचे अध्यक्ष |
राजेंद्र सिंह यांना पाणी पुरस्कार घोषित :
- राजेंद्र सिंह यांना 2015 चा स्टॉकहोम पाणी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
- पाणी पुरस्कार नोबेलसारखाच समजला जातो.
- भारतीय जल संवर्धंनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
- 150,000 डॉलर आणि विशेष मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- तसेच 26 ऑगस्ट रोजी जागतिक जल सप्ताहादरम्यान त्यांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
- 2001 मध्ये राजेंद्र सिंह यांना रेमन ‘मॅगेसेसे‘ने गौरविण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):
317 कोटींचा खर्च मोदींच्या प्रदेशदौर्यावर :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रदेश दौर्यावर सरकारी तिजोरीतून 317 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
- यूपीए 2 मधील मंत्रिमंडळाच्या परदेशी दौर्यापेक्षा मोदी सरकारच्या परदेश दौर्यावरील खर्चात 58 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
आता सातही दिवस दुकाने खुली :
- राज्यातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील 365 दिवसही आपली दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे.
- याआधी दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुट्टी बंधनकारक होती.
- तसेच महिला कर्मचार्यांचा वेळ दीड तासाची सवलत देत 9.30 असा करण्यात आला आहे याआधी तो 8 वाजेपर्यंतच होता.
पाठवा पैसे आता फेसबूक मेसेंजरवरूनही :
- फेसबुक मेसेंजरमध्ये आता एक नवे फीचर अॅड केले जाणार असून आता फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून तुम्ही पैसे ट्रान्स्फर करू शकता.
- महितींनुसार फेसबुक मेसेंजरमधून पैसे ट्रान्स्फर करण्याचे फीचर सध्या अमेरिकेतील फेसबूक यूजरसाठीच उपलब्ध केले जाणार आहे.
- या फीचरचा लाभ घेण्यासाठी डेबिट कार्डची नोंद करावी लागणार आहे.
नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविणार :
- 4.50 लाख रूपयांएवजी 6 लाख रुपये नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा होणार आहे.
- याची अमलबजावणी ह्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.
रामकृष्णन होणार रॉयल सोसायटीचे अध्यक्ष :
- भारतीय वंशाचे नोबेल परितोषिक विजेते वेंकटरमन रामकृष्णन यांची रॉयल सोसायटीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
- 1 डिसेंबर 2015 ला ते सोसायटीचे अध्यक्षपदाचा पदभार सांभाळणार आहेत.