Current Affairs (चालू घडामोडी) of 31 March 2015 For MPSC Exams
अ.क्रTable of Contents |
ठळक घडामोडी |
1. | मरणोत्तर पं.मालवीय यांना ‘भारतरत्न’ प्रदान |
2. | जी.के.उपाध्याय टेलिकॉम सर्कलच्या महाव्यवस्थापकपदी |
3. | दिनविशेष |
मरणोत्तर पं.मालवीय यांना ‘भारतरत्न’ प्रदान :
- बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीचे संस्थापक व हिंदू महासभेचे नेते पंडित मदन मोहन मालवीय यांना सोमवारी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- मालवीय यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
- या सोहळ्यात पद्म पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
- त्यात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, प्रकाशसिंह बादल वस्वामी राम भद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
- तर पत्रकार रजत शर्मा यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
- तसेच बॅटमिंटनपट्टू पी.व्ही.सिंधु, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गीतकार प्रसून जोशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
जी.के.उपाध्याय टेलिकॉम सर्कलच्या महाव्यवस्थापकपदी :
- महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलच्या महाव्यवस्थापकपदी जी.के.उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- 1978 च्या बॅचचे जी.के.उपाध्याय अधिकारी आहेत.
दिनविशेष :
- 1927 – श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
- 1982 – भारतीय पहिल्या जग्वार विमानाने आकाशात झेप घेतली.
- 1997 – शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना यूनेस्कोतर्फे दिला जाणारा कालीग पुरस्कार प्रदान.
- 2001 – एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सचिन तेंडुलकरने 10,000 धावा करून विक्रम नोंदवला.