Current Affairs of 8 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2016)
व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर :
- भारतात सुलभतेने व्यवसाय करण्याच्या मुद्यावर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वोच्च स्थानी आहे.
- सिंगापुरातील एशिया काँपिटिटिव्ह इन्स्टिट्यूटने (एसीआय) यासंबंधी अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली.
- व्यवसाय सुलभता, स्पर्धात्मकता, थेट विदेशी गुंतवणूक इ. अनेक पैलूंच्या बाबतीत राज्यांचा अभ्यास करण्यात आला.
- विशेष म्हणजे या सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून आले.
- एसीआयचे रिसर्च फेलो शशिधरन गोपालन यांनी सांगितले की, भारतातील 21 राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास यात करण्यात आला.
- अभ्यासातील निष्कर्षानुसार, व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली एनसीआर, गोवा आणि आंध्र प्रदेश ही पाच राज्ये आघाडीवर आहेत.
- स्पर्धात्मक वातावरणाच्या बाबतीत महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर, गुजरात आणि कर्नाटक ही राज्ये आघाडीवर आहेत.
- थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक ही पाच राज्ये आघाडीवर आहेत.
Must Read (नक्की वाचा):
गुगल विकसित करणार ‘भारत सेव्ह्ज’ वेबसाईट :
- प्रख्यात अमेरिकी कंपनी गुगल ‘भारत सेव्ह्ज’ या नावाची वेबसाईट तयार करणार आहे.
- तसेच या वेबसाईटवर भारतातील वित्तीय नियोजनाची सर्व प्रकारची माहिती असेल.
- भारतात गुगलचा मोठा विस्तार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
- आपली वेबसाईट कंपनी भारत सरकारच्या वित्तीय जन-धनसारख्या योजनांशी जोडणार आहे.
- 2014 रोजी सुरू करण्यात आलेल्या जन-धन योजनेत 24 कोटी नवी बँक खाती उघडण्यात आली आहेत, तसेच 41 हजार कोटी रुपये बँकांत जमा झाले आहेत.
- वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यासंदर्भात गुगल सध्या सरकारशी चर्चा करीत आहे.
- कंपनीच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे वित्तीय साक्षरता निर्माण होण्यास मदत होईल, तसेच वित्तीय योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल.
- गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांच्या व्यापक वित्तीय दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या अनेक संस्था आणि औद्योगिक संघटना या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी एकत्र येत आहेत.
- वित्तीय साक्षरता आणि जाणीव जागृती मोहीम या योजनेचा भागच असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसच्या दौर्यावर :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशियन-भारत आणि पूर्व अशिया शिखर परिषदेसाठी (दि.7) येथे आगमन झाले.
- दक्षिणपूर्व अशियातील या देशांशी भारताचे व्यापारी आणि सुरक्षेचे करार या दौऱ्यात अधिक बळकट केले जातील.
- मोदी यांची लाओशियन पंतप्रधान थोंगलोऊन सिसौलिथ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहे.
- तसेच या चर्चेत दहशतवाद, सागरी सुरक्षा, विभागीय सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी आणि अशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य आदींवर चर्चा होईल.
- 21 सदस्यांच्या खास अशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य गटात समावेश करून घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
इस्लामीचा नेता मीर कासीम अली याला फाशी :
- जमात-इ-इस्लामी या मूलतत्त्ववादी पक्षाचा नेता मीर कासीम अली याला ढाका येथे फाशी देण्यात आली.
- 1971 मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामावेळी करण्यात आलेल्या मानवतेविरोधातील गुन्ह्यांच्या आरोपांतर्गत अलीला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती.
- सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली होती.
- जमात-इ-इस्लामी या पक्षासाठी आर्थिक पाठबळ जमविणाऱ्या मुख्य नेत्यांमध्ये अलींचा समावेश होता.
- तसेच यापूर्वी या पक्षाचा प्रमुख निझामी याच्या दोन निकटवर्तीयांचा अशा स्वरुपाच्या दयेचा अर्ज बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी फेटाळून लावला असून त्यांना गेल्या वर्षी (2015) मृत्युदंड देण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 1918 : डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्मदिन.
- 1926 : जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
- 1933 : आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक यांचा जन्मदिन.
- 1997 : डॉ. श्रीमती कमला सोहोनी, भारतातील पहिल्या महिला जैवरसायन शास्त्रज्ञ व आहारतज्ञ स्मृतीदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा