Current Affairs of 14 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (14 सप्टेंबर 2016)
देवेंद्रने विश्वविक्रमासह दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकाविले :
- रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.
- देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला.
- तसेच पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
- ऑलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भारताला पॅरालिंपिकमध्ये मात्र दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे.
- रिओ पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळाले आहे.
- डाव्या हाताने अपंग असलेल्या 36 वर्षीय देवेंद्रला केंद्र सरकारकडून 2004 मध्ये अर्जुन आणि 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे पुरस्कार मिळविणारा हा पहिला पॅरालिंपियन खेळाडू आहे.
- रिओ पॅरालिंपिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ46 प्रकारात देवेंद्रने विश्वविक्रम नोंदविला.
- तसेच यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते.
- जागतिक क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे. देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे.
Must Read (नक्की वाचा):
युनायटेड विश्व कुस्तीच्या क्रमवारीत साक्षी मलिक चौथ्या स्थानी :
- रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीचे कांस्य जिंकणारी महिला मल्ल साक्षी मलिक युनायटेड विश्व कुस्तीच्या नव्या क्रमवारीत 58 किलो वजन गटात करिअरमध्ये सर्वोत्कृष्ट चौथ्या स्थानावर दाखल झाली आहे.
- ऑलिम्पिक पदकविजेती पहिली भारतीय मल्ल साक्षीला याआधी कुठलीही रँकिंग नव्हते.
- पुरुष फ्रीस्टाईलमध्ये संदीप तोमर आणि बजरंग पुनिया हे मल्लदेखील आघाडीच्या 20 जणांमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले.
- ऑलिम्पिकच्या पहिल्या लढतीत पराभूत झालेला संदीप 57 किलो वजन गटात 15 व्या आणि बजरंग 61 किलो गटात 18 व्या स्थानावर आहे.
सर्वांत उंच पूल वाहतुकीसाठी खुला होणार :
- चीनमधील ग्वेझोऊ प्रांतात नदीवरील जगातील सर्वांत उंच पूल बांधण्याचे काम सुरू असून तो लवकरच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
- नदीपासून तब्बल 565 मीटर (1,854 फूट) उंचीवर हा पूल आहे.
- ‘बेइपानजियांग’ असे या पुलाचे नाव आहे. या पुलाची लांबी 1,341 मीटर इतकी असून, त्याची दोन्ही टोके जोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.
- तसेच या वर्षअखेरीपर्यंत पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा चीन सरकारचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.
- या पुलामुळे लिउनपान्शुई आणि शुआनवेई या दोन शहरांमधील अंतर पाच तासांऐवजी दीड तासांवर येणार आहे.
- चीनने मागील महिन्यात जगातील सर्वांत मोठ्या लांबीचा काचेचा पूल नागरिकांसाठी खुला केला होता.
- मात्र, मागील आठवड्यात दुरुस्तीसाठी तो बंद करण्यात आला आहे.
केंद्राची उच्चशिक्षणासाठी ‘हेफा’ योजनेला मंजुरी :
- देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची उपलब्धता व त्यांच्या विकासासाठी केंद्रीय उच्चशिक्षण वित्तसंस्थेची (हेफा) स्थापना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने (दि.12) रोजी मंजुरी दिली, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
- तसेच त्याप्रमाणे तंत्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 3600 कोटी रुपयांचा निधीही केंद्राने मंजूर केला आहे.
- मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर जावडेकर यांनी ही माहिती दिली.
- उच्चशिक्षणाची गंगा गावोगावी पोचविण्यासाठी ‘हेफा’ची स्थापना केंद्राने केली आहे.
- या अंतर्गत एखाद्या विद्यापीठाच्या अखत्यारीतील; पण ग्रामीण व दुर्गम भागांतील शिक्षण संस्थेत उच्चशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
- ‘हेफा’च्या स्थापनेसाठी दोन हजार कोटींचा प्राथमिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यात सरकारची भागीदारी एक हजार कोटींची असेल.
- उर्वरित निधी एखाद्या प्रायोजक वा उद्योजकांच्या मदतीने उभा करण्यात येईल.
- ‘हेफा’शी संलग्न होणाऱ्या संबंधित शिक्षण संस्थांमधील उच्चशिक्षण सुविधा व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी दहा वर्षांच्या कालावधीसाठी कर्जरूपाने निधी उपलब्ध करण्याचीही तरतूद केली जाणार आहे.
- तसेच याशिवाय ‘आयआयटी’, ‘आयआयएम’ व ‘एनआयटी’ शिक्षण संस्थांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 20 हजार कोटींचा निधी उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली आहे.
दिनविशेष :
- भारतीय हिंदी दिवस
- 1901 : यमुनाबाई हिर्लेकर, शिक्षणतज्ञ, विचारवंत जन्मदिन.
- 1932 : डॉ. काशीनाथ घाणेकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते जन्मदिन.
- 1960 : ओपेकची स्थापना करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा