Current Affairs of 16 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2016)
न्यूयॉर्क खंडपीठामध्ये डायने गुजराती यांची न्यायाधीशपदी नियुक्ती :
- भारतीय-अमेरिकन वंशाच्या महिलेची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली असल्याचे व्हाइट हाउसतर्फे सांगण्यात आले.
- अमेरिकेतील जिल्हा न्यायालयाच्या न्यूयॉर्क खंडपीठामध्ये 47 वर्षीय डायने गुजराती यांची ओबामा यांनी न्यायाधीशपदी नियुक्ती केली असून, सिनेटच्या मंजुरीनंतर त्या कार्यभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.
- तसेच त्या अमेरिकेतील नागरिकांची योग्य प्रकारे सेवा करतील, असे ओबामा यांनी म्हटल्याचे व्हाइट हाउसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- भारतीय-अमेरिकन वंशाच्या गुजराती या 2012 पासून दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्याच्या न्यायाधीशांच्या कार्यालयात गुन्हे विभागाच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
- गुजराती या अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील लष्करी अकादमीतील प्राध्यापक दामोदर गुजराती यांच्या कन्या आहेत.
- दामोदर गुजराती यांनी 1960 मध्ये मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली होती.
- तसेच 1965 मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली होती.
Must Read (नक्की वाचा):
भारतीय कंपनीला याहूचे नाव वापरण्यास मनाई :
- याहू कंपनीचा ट्रेडमार्क वापरण्यापासून भारतीय कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.
- अमेरिकेतील याहू कंपनीचे नोंदणीकृत नाव वापरणे, हे नियमांचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
- एप्रिकॉट फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे (एएफपीएल) संचालक संजय पटेल आणि श्री जी ट्रेडर्स यांच्याविरुद्ध ट्रेडमार्क नियमांचा भंग केल्याप्रकरणी याहू इन्कॉर्पोरेशनने खटला दाखल केला होता.
- तसेच या कंपन्यांनी याहूला 32 लाख नुकसान भरपाई आणि 6.44 लाख रुपये न्यायालयीन खर्च द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
- एएफपीएलने त्यांची उत्पादने ‘याहू मसाला चक्र’ आणि ‘याहू टोमॅटो टॅंगी’ या नावाने बाजारात विक्रीसाठी आणली होती. हा ट्रेडमार्क नियमांचा भंग असल्याचे याहूचे म्हणणे होते.
- या सुनावणीला एएफपीएलचे संचालक आणि प्रतिनिधी उपस्थित नव्हते; तसेच लिखित स्वरूपातही कंपनीने न्यायालयात म्हणणे मांडले नाही.
- श्री जी ट्रेडर्सने याहूच्या नावाचा वापर केला नसल्याचे न्यायालयात सांगितले. यावर याहूने त्यांच्याविरुद्धची भरपाईची मागणी मागे घेतली.
बलुच भाषेत आता संकेतस्थळ व मोबाईल ऍपही :
- बलुचिस्तानमध्ये रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यानंतर तेथील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचण्याच्या हेतूने आता बलुच भाषेत संकेस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याची योजना ऑल इंडिया रेडिओने (एआयआर) आखली आहे.
- तसेच येत्या आठवड्याभरात ही सुविधा प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे.
- बलुचिस्तानशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने तेथे रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता.
- तसेच त्यानुसार आता दररोज विविध कार्यक्रम रेडिओद्वारे प्रसारित केले जातात. यात दैनंदिन बातम्यांचाही समावेश आहे.
- या कार्यक्रमांना बलुच नागरिकांबरोबर इतर देशांतील नागरिकांचाही प्रतिसाद मिळावा, या हेतूने संकेतस्थळ व मोबाईल ऍप सुरू करण्याचा विचार सुरू होता. त्यावर तातडीने निर्णय घेत ही सुविधा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे.
- डिजिटल युगात आपला श्रोतावर्ग वाढविण्यावर प्रसार भारतीने आपले लक्ष केंद्रित केले असून, संकेतस्थळ व ऍप सुरू करणे या त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.
- बलुच नेते ब्रह्ममदाग बुग्ती यांची मुलाखत घेण्यासाठी डीडी न्यूजने नुकतीच आपली एक टीम जिनिव्हा येथे पाठविली होती.
- रेडिओ सेवेचा लाभ पाकिस्तानबरोबर इतर शेजारी देशातील नागरिकही घेतात.
- काश्मीरप्रश्नी होणारा पाकिस्तानचा हस्तक्षेप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता.
- तसेच त्याला बलुची नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याची मागणी केली होती.
- ‘एआयआर’चा विस्तार –
- 108 देशांमध्ये प्रसारण
- 27 भाषांमध्ये विविध कार्यक्रम
- कार्यक्रमांत 15 परदेशी भाषांचा अंतर्भाव
ऑगस्ट महिना हा 136 वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरला :
- गेल्या 136 वर्षांपासून मॉन्सूनसंदर्भात नोंद करण्यात येत असलेल्या आधुनिक पद्धतीनुसार ऑगस्ट महिना हा गेल्या 136 वर्षांतील सर्वाधिक उष्ण ठरल्याचे नासा या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे.
- नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्युट ऑफ स्पेस स्टडीज (जीआईएसएस) ने वैश्विक तापमानाचे केलेल्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे.
- यामध्ये ऑगस्ट 2014 च्या तुलनेत ऑगस्ट 2016 चे तापमान 0.16 डिग्री सेल्सियस जास्त असल्याचे आढळून आले आहे.
- तसेच 1951 ते 1980 दरम्यान आलेल्या ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या ऑगस्टच्या महिन्यातील सरासरी तापमानानाच्या तुलनेत 0.98 डिग्री सेल्सियस अधिक असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
- ‘हवामानातील बदलांचा पृथ्वीवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी हवामानाबाबतच्या दीर्घकाळाच्या माहितीवर आम्ही भर देत आहोत’, अशी माहिती जीआईएसएसचे संचालक डेविन श्मिट यांनी दिली.
दिनविशेष :
- जागतिक ओझोन संरक्षण दिन
- 1963 : मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
- 1963 : झेरॉक्स 914 या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
- 1994 : मराठी साहित्यिक ‘जयवंत दळवी’ पुण्यतिथी.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा