Current Affairs of 26 September 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (26 सप्टेंबर 2016)
आंतरराष्ट्रीय नेमबाजीसाठी विश्वजीत शिंदे यांची निवड :
- जागतिक रेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबईकर विश्वजीत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
- 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान फ्रान्स येथील माद्रिद शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे.
- या आधी पोलंडच्या क्रेकाऊ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विश्वजीत यांनी सुवर्ण पदक मिळविले आहे.
- तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक पदके मिळविली आहे.
- विशेष म्हणजे, विश्वजीत यांच्यासह सुमा शिरूर, अयोनिका पॉल, तेजस्विनी मुळ्ये, स्वप्निल कुसळे, जितेंद्र विभुते, सुमेध देवळालीवाला, रुचिता विणेरकर हे नामांकित नेमबाजदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
- दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक रायफल क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून विश्वजीत शिंदे यांनी अनेक गुणवान नेमबाज घडवले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
राजा माने राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी :
- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांची एकमताने निवड करण्यात आली.
- राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
- राजा माने हे सध्या शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आहेत.
- 29 सप्टेंबरला पुणे विभागीय कार्यालयात ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या अध्यक्षतेखाली व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राजा माने यांचा सत्कार होणार आहे.
- तसेच याच कार्यक्रमात पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
तनय ठरला ‘डान्स प्लस 2’चा बादशाह :
- जळगाव येथील तनय मल्हारा हा स्टार प्लस वाहिनीवरील ‘डान्स प्लस 2’या नृत्यस्पर्धेत विजेता ठरला आहे.
- अवघ्या 14 वर्षांचा सर्वात कमी वयाचा डान्सिंग आयकॉन होण्याचा मान तनयला मिळाला आहे.
- वाईल्ड रिपर्स हा ग्रुप उपविजेता तर पीयूष भगत सेकंड रनरअप ठरला.
- ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक हिच्या हस्ते त्याला अभिनेता रणबीर कपूरच्या उपस्थितीत 25 लाख रुपयांचे पहिले बक्षिस तसेच कार व इतरही बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावर झाला.
- तनयच्या विजयाची माहिती जळगावमध्ये सोशल मीडियाद्वारे पोहोचताच फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
- रविवारी (दि.25) स्टारच्या स्टुडिओत झालेल्या ग्रँड फिनालेत प्रेक्षकांचा कौल जाहीर करण्यात येऊन तनयला विजेता घोषित करण्यात आले.
चीनची महादुर्बीण अखेर कार्यरत :
- चीनने (दि.25) जगातील सगळ्यात मोठ्या व प्रचंड आकाराच्या रेडिओ दुर्बीणचा वापर सुरू केला.
- फुटबॉलची 30 मैदाने एकत्र केल्यावर जेवढा आकार होईल तेवढी ही दुर्बीण असून ती 4,450 परावर्तक आरशांपासून (रिफ्लेक्टर पॅनेल्स) बनलेली आहे.
- तसेच या विश्वाचा जन्म वा उत्पत्ती कशी झाली आणि पृथ्वीच्या बाहेरील जीवनाचा शोध घेण्यास ही दुर्बीण मदत करील.
- चीनच्या अकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल अॅस्ट्रॉनोमिकल ऑब्झर्वेशनचे उप प्रमुख झेंग शिओनियन यांनी ही माहिती सांगितली.
- गुईझोऊ प्रांतातील पिंगटॅँग परगण्यातील कार्स्ट खोऱ्यात ही दुर्बीण आहे.
- हा दुर्बीण प्रकल्प 2011 मध्ये सुरू झाला व त्यासाठी 1.2 अब्ज युआन (180 दशलक्ष अमेरिकन डॉलर) खर्च आला.
आगा खान चषक स्पर्धेत मराठा लाईट इन्फन्ट्रीचे विजेतेपद :
- महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या सहकार्याने पार पडलेल्या 113 व्या आगा खान चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत मराठा लाईट इन्फन्ट्री (एमएलआय) ‘अ’ संघाने (दि.25) पुरुष गटात विजेतेपद पटकाविले.
- महिलांमध्ये नवी दिल्ली येथील जिझस अँड मेरी कॉलेज संघाने बाजी मारली.
- पिंपरी-चिंचवड येथील नेहरूनगर परिसरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या चुरशीच्या अंतिम फेरीत एमएलटी ‘अ’ संघाने लखनौ येथील के. डी. सिंगबाबू सोसायटी संघावर 2-1 ने विजय मिळविले.
- तसेच दुसरीकडे एकतर्फी झालेल्या सामन्यात आझम कॅम्पस संघाला 5-0 ने पराभूत करून जिझस अँड मेरी संघाने महिला गटाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा