Current Affairs of 8 October 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2016)
विश्वनाथन आनंद संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी :
- पाच वेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद याने दहाव्या ताल मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेत (दि.7) येथे अर्मेनियाचा लेवोन आरोनियन याच्यासोबतची लढत बरोबरीत सोडवली. त्याचबरोबर, तो संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानावर राहिला.
- आनंदसाठी ही स्पर्धा संमिश्र यशाची ठरली. त्यात त्याला काही रेटिंग गुण मिळतील.
- तसेच या स्पर्धेत आनंदने 2 डाव जिंकले. एका डावात त्याला पराभव पत्करावा लागला आणि 6 डाव बरोबरीत सुटले.
- आरोनियनविरुद्धची लढत चुरशीची झाली. तथापि, आनंद इटालियन ओपनिंगने विजयाच्या स्थितीत पोहोचू शकला नाही.
- तसेच या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी 40 चालींनंतर ड्रॉवर सहमती दर्शवली.
- रशियाच्या इयान नेपोमनियाचीने अखेरच्या फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफंडविरुद्ध बरोबरी साधून विजेतेपद पटकावले.
Must Read (नक्की वाचा):
भारत-पाकिस्तान सीमा सील होणार :
- आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला शह दिल्यानंतर भारताने दहशतवाद्यांच्या घुसखोरीची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे.
- पाकिस्तानला लागून असणारी सीमा पूर्णपणे सील करण्याचा निर्णय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी घेतला आहे.
- तसेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डिसेंबर 2018 पर्यंत तडीस नेण्याचा सरकारचा विचार असून, तो अधिक अद्ययावत व्हावा म्हणून त्याची तांत्रिक बाजूही मजबूत केली जाणार आहे.
- राजनाथ यांनी चार राज्यांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतला.
जुआन मॅन्युएल सँटोस यांना 2016 चा ‘शांतता नोबेल पुरस्कार’ जाहीर :
- कोलंबियाचे अध्यक्ष जुआन मॅन्युएल सँटोस यांना 2016 सालचा ‘शांततेचा’ नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
- कोलंबियामध्ये गेल्या 50 वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपवण्यासाठी त्यांनी झोकून देऊन जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
- तसेच गेल्या 52 वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात आत्तापर्यंत 2 लाख 60 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 6 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत.
पर्यटनस्थळी कचरा केल्यास दंडात्मक करवाही होणार :
- ऐतिहासिक वारसा असलेल्या पर्यटनस्थळांच्या 300 मीटर परिघात पॉलिथीन बॅग टाकून देणाऱ्या व इतर कचरा करणाऱ्यांना आता दंडही भरावा लागणार आहे.
- तसेच याबाबतची तरतूद असेलली कायदा दुरुस्ती केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी सांगितले.
- पंतप्रधानांच्या कल्पनेतून जन्माला आलेल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेत साजऱ्या झालेल्या स्वच्छता पंधरवड्याबाबत ग्रामविकासमंत्री नरेंद्र तोमर यांच्यासह शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
- अर्थात या 300 मीटरमधील 100 मीटरचा परिसरच पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतो.
- उर्वरित 200 मीटर परिसरात स्थानिक पालिकेचे; पर्यायाने राज्य सरकारचे राज्य असते. त्यामुळे हे प्रस्तावित ‘दंडकारण्य’ आणण्यासाठी केंद्राला राज्यांची सहमतीही मिळवावी लागणार आहे.
- देशातील 3686 स्थळांना पुरातत्त्व विभागाने संरक्षित ठिकाणे म्हणून घोषित केले आहे, त्यात ताजमहाल, लाल किल्ला, अजेमरचा दर्गा, कुतुबमिनार, खजुराहो, अजिंठा-वेरुळची लेणी आदी प्रख्यात ठिकाणांचा यात समावेश आहे.
- तसेच या ठिकाणी देशी-विदेशी पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता केंद्राने 1363 या क्रमांकाची हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे.
- यासोबतच ही हेल्पलाइन जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आदी 12 भाषांत उपलब्ध असून, असा प्रयोग जगात पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे.
मध्य प्रदेशमध्ये हिरे खाणीचा पहिला लिलाव :
- मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या हातूपूर हिरा खजिन पट्ट्याचा ई-लिलाव झाला.
- लिलाव झालेली ही हिऱ्याची पहिलीच खाण ठरली आहे. या खाणीत 106 कोटी किमतीच्या हिऱ्यांच्या खनिजाचा साठा आहे.
- मध्य प्रदेशचे खनिज संपत्ती सचिव मनोहर दुबे यांनी ही माहिती जारी केली.
- मनोहर दुबे यांनी सांगितले की, 12 जानेवारी 2015 पासून लागू करण्यात आलेल्या खाण आणि खनिज (विकास आणि नियंत्रण) अधिनियम 1957 मधील तरतुदीनुसार पारदर्शक पद्धतीने ई-लिलाव पार पाडण्यात आला. त्यात बन्सल कन्स्ट्रक्श्न वर्क्स प्रा. लि. कंपनीने सर्वाधिक बोली लावली.
- तसेच या लिलावात रुंगटा माइन्स लिमिटेड, त्रिवेणी अर्थमुव्हर्स, पुष्पांजली ट्रेडविन आणि बन्सल कन्स्ट्रक्शन वर्क्स या कंपन्यांनी भाग घेतला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा