राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 5
राष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 5
- पॅरेकोव्हायरस हा संसर्गजन्य विषाणू आहे. या विषाणूमुळे लहान बालके मतिमंद होतात व त्यांना मस्तिष्कघात होतो. हा आजार विशेषत: लहान बालकांमध्ये आढळतो, शरीरातून निघणार्या द्रवामधून या ‘व्हायरस’ च प्रसार होतो. 2 ते 5 वयोगटातील बालकांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. हा आजाराचा अधिक प्रसार ऑस्ट्रेलियात झाला.
- भारताला भेट देणार्या अग्रगण्य 15 देशांच्या पर्यटकांमध्ये बांगलादेश (14%) ब्रिटन (13.16%), अमेरिका (11.84%) जर्मनी (3.74%) सिंगापूर (1.67%) थायलंड (1.60%) मध्यप्रदेशात मुख्यमंत्र्याच्या पेन्शनमध्ये 600 टक्के वाढ करण्यात आली आहे.
- केरळच्या ताजहतंगडी जुम्मा मशिदीत 1 हजार वर्षांनंतर प्रथमच महिलांना प्रवेश मिळाला.
- श्रीलंकेत नुवाराच्या अशोक वाटीकेत रावणाने ज्या ठिकाणी सितेला कैद केले होते त्या ठिकाणी मध्यप्रदेश सरकार सीता मंदिर उभारणार आहे.
- 4 सप्टेंबर 2016 रोजी मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा व्हॅटिकन सिटीची प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी घोषणा केली. मदर तेरेसा यांनी 45 वर्षे भारतातील गरीब, उपेक्षित, अनाथ, रुग्ण सर्वांसाठी जीवन समर्पित केले होते. 26 ऑगस्ट 1910 रोजी मॅसिडोमिया येथे जन्म, 5 सप्टें. 1997 रोजी मृत्यु झाला. 1979 नोबेल, 1980 मध्ये त्यांना भारतरत्न प्रदान केले होते. तसेच 1962 मध्ये त्यांना पद्मश्री बहाल.
- मदर तेरेसा ह्या पाचव्या भारतीय कॅथलिक संत होणार. पाच भारतीय मानकरी यामध्ये वसईचे धर्मगुरू गोन्साली गार्सिया, केरळमधील सिस्टर अल्फान्सो व धर्मगुरु कुरुयाकोसे, एलियस चावरा.
- देशातील पहिले ग्रीनफिल्ड प्रकारातील पहिले खाजगी विमानतळ अंदल (प.बंगाल)
- देशातील पहिले वाय-फाय पाचगाव (महाराष्ट्र)
- भारतात प्रथम इ-रेशन कार्ड नवी दिल्ली येथे वितरित करण्यात आले.
- देशातील मराठी भाषेचे पहिले स्वायत्त मराठी विद्यापीठ बदलापूर येथे आहे.
- गुजरात हे ऑनलाइन मतदान सुरू करणारे देशातील पहिले राज्य.
- सर्व पोलीसठाणे ऑनलाइन असणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे.
- सेवा हमी कायदा राबविणारे देशातील पहिले राज्य मध्यप्रदेश व महाराष्ट्र (20 वे)
- देशातील पहिली चालकरहित कार टाटा नॅनो ऑटोनॉमस
- ‘टाइम’ च्या इंटरनेटवरील सर्वात प्रभावी व्यक्तीच्या क्रमवारीत सलग दुसर्यांदा नरेंद्र मोदी प्रथम स्थानावर (इंटरनेट स्टार दर्जा)
- पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका या आपत्कालीन सेवेसाठी 112 क्रमांक या अगोदर पोलीस (100), अग्निशामक दल (101), रुग्णवाहिका (102) असे क्रमांक होते. 1 जानेवारी 2017 पासून ही सेवा सुरू होणार आहे.