4 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

4 November 2018 Current Affairs In Marathi

4 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (4 नोव्हेंबर 2018)

दूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे बंद होणार:

  • डिजिटलच्या तुफानात दूरदर्शनचा काड्यांचा अ‍ॅँटेना इतिहासजमा होणार आहे. अ‍ॅनालॉग पद्धतीची देशभरातील सुमारे 1400 प्रक्षेपण केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. DD India
  • पहिल्या टप्प्यात 272 केंद्रे बंद करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 214 केंद्रे 17 नोव्हेंबरला बंद होतील. राज्यातील साता-यासह 12 केंद्रांचा त्यात समावेश आहे.
  • सध्या डिजिटलचा जमाना आहे. त्यातच अ‍ॅनालॉग पद्धतीच्या प्रक्षेपकाची (ट्रान्समीटर) आयुमर्यादा सुमारे 15 वर्षे असते. सध्याच्या काळात नवे ट्रान्समीटर तुलनेने खर्चिक आहेत.
  • शिवाय उपग्रह (डीटीएच) सेवा स्वस्त आहे. यामुळे 15 वर्षांहून अधिक काळ झालेले ट्रान्समीटर बंद करण्याचा निर्णय 2015 मध्ये केंद्र सरकारने घेतला. त्याची अंमलबजावणी 2018 मध्ये सुरू झाली.

दिवाळीत रेल्वेच्या सहा अतिरिक्त गाड्या:

  • दिवाळीनिमित्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष सोय केली आहे. सणासाठी घरी जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता सहा अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला आहे.
  • दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटीने नियोजन केले असताना रेल्वेनेही प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नियोजन केले आहे. यासाठी सीएसएमटी-मंडुवाडीह, सीएसएमटी-संतरागाछी आणि पुणे-गोरखपूर या मार्गांवर अतिरिक्त सहा गाड्या धावणार आहेत.
  • सीएसएमटी-मंडुवाडीह ही रेल्वे जबलपूर मार्गे अलाहाबादला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुणे-गोरखपूर ही रेल्वे जबलपूर मार्गे सीएसएमटी-संतरागाछी एक्‍स्प्रेस नागपूर मार्गे टाटानगरला पोहचणार आहे. त्यामुळे दिवाळीसाठी रेल्वेने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.

काश्मीरमध्ये मोसमातील पहिली हिमवृष्टी:

  • काश्मीर खोऱ्यात मोसमातील पहिली हिमवृष्टी झाली असून उर्वरित देशाशी काश्मीरचा संपर्क तुटला आहे.
  • श्रीनगर येथे 3 नोव्हेंबर रोजी दुपारी हिमवृष्टी सुरू झाली. हिमाचे अनेक इंचाचे थर जमले होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 2009 नंतर प्रथमच नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली आहे. Jammu-Kashmir
  • गेल्या दोन दशकात चौथ्यांदा नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली आहे. 2008 व 2004 मध्येही नोव्हेंबरमध्ये हिमवृष्टी झाली होती. काही जिल्ह्य़ांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली असून अनेक शहरांतून हिमवृष्टीच्या बातम्या आल्या आहेत. काही ठिकाणी हिमकडे कोसळले आहेत.
  • बांदीपोरा जिल्ह्य़ात गुरेझ येथे हिमकडे कोसळले असून तेथे हिमाचा निपटारा करण्यासाठी यंत्रसामुग्री पाठवण्यात आली आहे.
  • श्रीनगर-जम्मू मार्ग बंद झाला असून काश्मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला आहे कारण तेथील वाहतूक बंद झाली आहे.

पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त झाले:

  • आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने कपात होत आहे.
  • मुंबईत पेट्रोलच्या दरात 21 पैशांनी कपात झाली आहे. तर, डिझेलचे दरही 18 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी 84.28 रुपये मोजावे लागणार आहेत, आणि प्रति लिटर डिझेलसाठी 76.88 रुपये मोजावे लागतील.
  • राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 21 पैसे आणि डिझेल प्रति लिटर 17 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 78.78 रुपये, तर डिझेलचा दर प्रति लिटर 73.36 रुपये झाला आहे. यामुळे नागरिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दिनविशेष:

  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी शिरढोण जि. कुलाबा, रायगड येथे झाला. vasudev balwant phadke
  • प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1884 मध्ये झाला.
  • कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1894 मध्ये झाला.
  • सन 1896 मध्ये पुण्यात डेक्कन सभेची स्थापना करण्यात आली.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने 4 नोव्हेंबर 1918 रोजी घटनेचा मसुदा सादर केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. विशाल पातील says

    आपला उपक्रम खुप छान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा मसुदा सादर केला. आपण चुकुन 1918 असे लिहीले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.