Current Affairs of 17 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (17 डिसेंबर 2016)

16 डिसेंबर हा भारताचा विजय दिवस :

  • भारतामध्ये आजचा दिवस 16 डिसेंबर विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • आजच्याच दिवशी 1971 साली भारताने पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला होता.
  • भारत-पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या दुस-या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमासमोर पाकिस्तानने अक्षरश: गुडघे टेकत शरणागती पत्करली होती.
  • पाकिस्तानी लष्कराच्या पूर्व कमांडने शरणागतीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर हे युद्ध समाप्त झाले.
  • भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयाला आज (17 डिसेंबर 2016) 45 वर्ष पूर्ण झाली.
  • तसेच या युद्धातून एका नव्या देशाची बांगलादेशाची निर्मिती झाली. त्यावेळी भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे लेफ्टनंट जनरल जे.एस. अरोरा प्रमुख होते.

भारतीय वंशाची महिला अमेरिकेत महापौर :

  • कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टीनो शहराच्या महापौरपदी प्रथमच भारतीय वंशाची अमेरिकी महिला निवडून आली आहे.
  • अ‍ॅपलच्या मुख्यालयामुळे हे शहर जगभर ओळखले जाते.
  • सविता वैद्यनाथन यांनी क्यूपर्टीनोच्या नव्या महापौर म्हणून गेल्या आठवड्यात शपथ घेतली.
  • एमबीए पदवीधारक सविता यांनी माध्यमिक शाळेत गणिताच्या शिक्षक म्हणून तसेच व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून काम केले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात होणार कर्करोग निदान केंद्र :

  • कॅन्सरचे (कर्करोग) दिवसेंदिवस वाढते प्रमाण लक्षात घेता या आजाराची वेळीच तपासणी करून त्यावर उपचार होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग निदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
  • भंडारा, सातारा, वर्धा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यापासून याची सुरुवात करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली.
  • राज्यात थायरॉईड, कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झालेल्या वाढीबाबतचा प्रश्न सदस्य सुनील केदार यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सावंत बोलत होते.
  • डॉ. सावंत म्हणाले की, नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्कराग केंद्राला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून हा निधी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी लवकरच शासकीय सेवेत :

  • ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता पोलीस अधिकारी होणार असून ते लवकरच खाकी गणवेशात दिसतील. वर्ग एकचे अधिकारी म्हणून ते शासकीय सेवेत रुजू होणार आहेत.
     
  • विजय चौधरी यांना लवकरच शासकीय सेवेत घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले होते.
  • विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली असून कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींनी नोकरी देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
  • विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन दिले.
  • 10 डिसेंबर रोजी जळगावचा विजय चौधरी सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी ठरला.

डिजिटल सेवेसाठी लवकरच सरकारी मोबाईल अॅप :

  • केंद्र सरकारकडून डिजिटल व्यवहारांसाठी लवकरच आधार कार्डाशी संलग्न असलेले मोबाईल अॅप सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.
  • तसेच या डिजिटल व्यवहारांच्या अंमलबजावणीसाठी देशभरातील एक कोटी जणांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • सरकार लवकरच अर्थ मंत्रालयाच्या मदतीने आधार कार्डावर आधारित असलेली व्यवहार प्रणाली (एईपीएस) सुरू करणार आहेत.
  • देशातील तब्बल 40 कोटी बँक खाती ही आधार कार्डाशी जोडली गेलेली आहेत.
  • सरकारकडून ई-पेमेंटसाठी सुरू करण्यात येणाऱ्या अॅपविषयी माहिती देताना रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, बायोमेट्रिक यंत्राद्वारे स्मार्टफोनचे रूपांतर पॉइंट ऑफ सेल (पीओएस) यंत्रात केले जाईल.
  • ई-व्यवहारांसाठी सामाईक व्यासपीठ (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) असलेले मोबाईल अॅप विकसित करण्यात येत आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.