Current Affairs of 4 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (4 जानेवारी 2017)

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर :

  • राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारे मराठी भाषा विभागाचे 4 सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाले आहेत.
     
  • श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनास तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्री. मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • तसेच यंदाचा मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार श्री. शाम जोशी यांना आणि डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ श्रीमती यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • तसेच मराठी भाषा गौरव दिनी, 27 फेब्रुवारी, 2017 रोजी हे चारही पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

फेब्रुवारीमध्ये सादर होणार अर्थसंकल्प :

  • संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीला सुरवात होणार असून, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
  • केंद्रीय मंत्रिमंडळातील संसदीय कामकाज समितीच्या झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात आला.
  • 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीदरम्यान पहिल्या टप्प्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संसदेच्या दोन्ही सभागृहांना 31 जानेवारीला संबोधित करतील.
  • तसेच 31 जानेवारीलाच आर्थिक सर्वेक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.
  • केंद्र सरकारने यापूर्वीच रेल्वे अर्थसंकल्प जाहीर नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पामध्येच सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे.
  • दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प यावर्षापासून लवकर सादर करण्यात येणार आहे.

दृष्टिहीनांसाठी ऑनलाइन विश्व खुले :

  • लुई ब्रेल याने लिपी तयार करून दृष्टिहीनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली केली.
  • सध्याच्या आधिनिक तंत्रज्ञानाच्या युगात जॉस (jaws), टॉक बॅक (Talk back) यासारख्या स्क्रीन रीडर तंत्रज्ञानाने दृष्टिहीनांसाठी ऑनलाईन विश्वदेखील खुले झाले आहे.
  • लहानपणी अपघाताने दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ब्रेल यांनी आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 1829 मध्ये स्पर्शज्ञानाने लिहिता, वाचता येणारी सहा बिंदूंची लिपी शोधून काढली.
  • दृष्टिहीन लोकांना नवी दृष्टी देणारी ही भाषा ‘ब्रेल लिपी’ म्हणून जगभरात मान्यता पावली.
  • तसेच 4 जानेवारी हा ब्रेल यांची 208 वी जयंती आहे. या ब्रेल लिपीचा पुढचा टप्पा म्हणजे स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरचा शोध. या सॉफ्टवेअरने दृष्टिहीनांसाठी अवघे ऑनलाईन विश्वच खुले केले आहे.

बाबा दळवी स्मृती पुरस्कार जाहीर :

  • लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे व्दितीय संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा 2015-16 चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
  • पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे –
  • पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा – वर्ष 201516 : प्रथम – अ‍ॅड.कांतीलाल तातेड, नाशिक, (बचत योजनांशी दगाफटका, लोकसत्ता); व्दितीय – मेघना ढोके, नाशिक, (तारकाटा बेडा, लोकमत);तृतीय- सुधीर द. फडके, पुणे, (शेती सिंचन हाच नियोजनाचा केंद्रबिंदू ठरावा, महाराष्ट्र सिंचन विकास).
  • बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा – वर्ष 201516 : प्रथम-सचिन राऊत, अकोला (किडनी रॅकेटचा छडा, लोकमत); व्दितीय – संजय देशपांडे, औरंगाबाद, (दुष्काळात धुतले हात, लोकमत); तृतीय – सचिन वाघमारे, पुणे (उस्मानाबाद:155 पाणी पुरवठा योजना रखडल्या, महाराष्ट्र टाईम्स). 

दिनविशेष :

  • 4 जानेवारी आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन आहे.
  • केसरी वॄत्तपत्राची निर्मिती 4 जानेवारी 1885 रोजी करण्यात आली.
  • भारतातील पहिले डिझेल वाराणसी येथे 4 जानेवारी 1964 रोजी तयार झाले.
  • 4 जानेवारी 1994 हा भारतीय संगीत दिग्दर्शक राहुल देव बर्मन यांचे स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.