नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग1)

नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग1)

  • उद्योग विरहित जिल्हा कोणता? – गडचिरोली.
  • गडचिरोली जिल्ह्याच्या व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती? – प्राणहिता.
     
  • सावली हे रेशमी कापडाच्या उत्पादनाशी संबंधीत असलेले ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – चंद्रपुर.
  • महाराष्ट्रातील कोणत्या भागात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणात येते? – विदर्भ.
  • फळे हवाबंद करण्याचा उद्योग कोणत्या जिल्ह्यात चालतो? – नागपूर.
  • महाराष्ट्रात दगडी कोळशाचे उत्पादन मुख्यत्वे कोणत्या भागात मिळते? – पूर्व विदर्भ.
  • राष्ट्रीय महामार्ग क्र.सात व सहा कोणत्या जिल्ह्यात एकत्र येतात? – नागपूर.
  • पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? – वर्धा.
  • खंडांतर्गत स्थानामुळे नागपूरचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? – विषम.
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता? – चंद्रपूर.
  • नागपूर विभागाचे प्रादेशिक नाव काय आहे? – विदर्भ.
  • महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? – नागपूर.
  • गडचिरोली हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? – चंद्रपूर.
  • महाराष्ट्रात विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? – नागपूर.
  • महाराष्ट्रातील सर्वात शेवटी अस्तित्वात आलेला जिल्हा कोणता? – गोंदिया.
  • महाराष्ट्राच्या अती पूर्वेकडील जिल्हा कोणता? – गडचिरोली.
  • नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? – सहा.
  • महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणते राज्य आहे? – आंध्रप्रदेश.
  • चंद्रपूर, भंडारा परिसरात सरासरी किती से.मी. पाऊस पडतो? – 150 से.मी.
  • नागपूर विभागाच्या पूर्व भागात कशा स्वरूपाचा पाऊस पडतो? – जास्त.
  • नागपूराहून मुंबईस जाताना कोणता घाट लागतो? – थळघाट (कसारा).
  • महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? – छत्तीसगड.
  • सह्याद्रि रांग कशी जाते? – उत्तर-दक्षिण.
  • गोदावरी व तापी नदीस वेगळी करणारी पर्वत रांग कोणती? – सातमाळा.
  • सातपुडा पर्वत रांग कशी पसरली आहे? – पूर्व-पश्चिम.
  • गाविलगड व नर्नाळा किल्ले कोणत्या पर्वतात आहेत? – सातपुडा.
  • महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून वाहणारी नदी कोणती? – नर्मदा.
  • वैनगंगा, पूर्णा, पैनगंगा, कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? – गोदावरी.
  • प्राणहिता हे नाव कोणत्या दोन नद्यांच्या संगमास म्हणतात? – वर्धा व वैनगंगा.
  • तापी व नर्मदा नद्या कशा वाहतात? – पूर्वेकडून-पश्चिमेकडे.
  • भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या भागास कशाचा प्रदेश म्हणतात? – तलावांचा.
  • बोदलकसा, नवेगाव बांध हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? – गोंदिया.
  • ताडोबा, घोडाझरी, असलमेंढा हे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहेत? – चंद्रपूर.
  • येलदरी व सिद्धेश्वर ही धरणे कोणत्या नदीवर बांधलेली आहेत? – पूर्णा.
  • मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतात उगम पावणारी नदी कोणती? – तापी.
  • गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागातून कोणती नदी वाहते? – प्राणहिता.
  • तुमसर येथे कशाची मोठी बाजारपेठ आहे? – तांदूळ.
  • सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च सेंटर कोठे आहे? – नागपूर.
  • सर्वाधिक मॅग्नीज खाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? – नागपूर.
  • नागपूर हे कोणत्या लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन आहे? – मुंबई-कलकत्ता.
You might also like
1 Comment
  1. Amol Bawne says

    I want to year wise orange fruit production in nagpur district

Leave A Reply

Your email address will not be published.