Current Affairs of 23 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (23 जानेवारी 2017)
मलेशिया मास्टर्स स्पर्धेत साईना नेहवालला विजेतेपद :
- भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालला प्रथमच मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यात यश आले आहे.
- 22 जानेवारी रोजी झालेल्या अंतिम फेरीतच्या सामन्यात साईनाने 46 मिनिटे चाललेल्या सामन्यात थायलंडच्या पोर्नपावी चोचूवोंगचा 22-10, 22-10 असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
- अग्रमानांकित साईनाने पहिल्या गेममध्ये 4-0 आघाडी घेतली होती. पण, 19 वर्षीय चोचूवोंगने कडवी लढत दिली. अखेर साईनाने 22-20 असा पहिला गेम जिंकण्यात यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तुल्यबळ लढत पहायला मिळाली.
- साईनाने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिचा उपांत्य फेरीत 21-13, 21-10 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.
- साईना दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे विजेतेपद महत्त्वाचे आहे. तसेच साईनाने यापूर्वी जून 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळविले होते.
Must Read (नक्की वाचा):
केदार जाधव मालिकावीर पुरस्काराने सन्मानित :
- कोलकाता वनडेत अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत इंग्लंडने पाच धावांनी विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला.
- भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. तीन सामन्यांत 230 धावा ठोकणाऱ्या केदारला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
- केदार जाधवने मालिकेत दबावाखाली खेळून चांगली फलंदाजी केली. पुण्यातील पहिल्या सामन्यात केदारने 120 धावांची खेळी केली होती. तर कटक येथे रंगलेल्या दुसऱ्य़ा एकदिवसीय सामन्यात त्याने अखेरच्या क्षणी 9 चेडूत 22 धावा केल्या होत्या.
- तसेच तिसऱ्या सामन्यात केदारने एकाकी झुंज देताना 75 चेंडूत 90 धावांची खेळी केली.
राष्ट्रपतींकडून चार आरोपींना जीवनदान :
- केंद्रीय गृहमंत्रालयाची शिफारस रद्दबाबत करीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चौघांना सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले.
- बिहारमध्ये 1992 मध्ये घडलेल्या हत्याकांड प्रकरणात या चौघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
- तसेच ही शिक्षा जन्मपेठेत रूपांतरित करून राष्ट्रपती मुखर्जी यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी कृष्णा मोची, नन्हेलाल मोची, वीर कुअर पासवान आणि धमेंद्र सिंह ऊर्फ धारू सिंग या चौघांना नवजीवन दिले.
- बिहार सरकारच्या शिफारशीनुसार गृहमंत्रालयाने 8 ऑगस्ट 2016 रोजी या चौघांची दयायाचिका रद्द करण्याची शिफारस केली होती.
- तथापि, राष्ट्रपतींनी या प्रकरणात विविध तथ्यांचा विचार केला. चौघांनी दयायाचिका उशिरा दाखल करणे आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मत या तथ्यांसह अन्य तथ्यांचा यात समावेश होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती :
- 23 जानेवारी 1926 रोजी जन्माला आलेल्या बाळ केशव ठाकरे यांची ओळख बाळासाहेब ठाकरे आणि देशातील कोट्यवधी जनतेसाठी हिंदू ह्रदय सम्राट अशी राहिली आहे.
- प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते.
- तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.
- पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, 1960 मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले.
- साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले.
- ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते.
- महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली.
- इ.स. 1960 पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
दिनविशेष :
- इ.स. 1556 मध्ये 23 जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला.
- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये कटक येथे झाले.
- 23 जानेवारी 1950 हा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते ऑटो डायलय यांचा जन्मदिन आहे.
- संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन 23 जनेवरी 1996 मध्ये झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा