Current Affairs of 25 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (25 जानेवारी 2017)
केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार :
- सर्वोच्च न्यायालयाने अर्थसंकल्प पुढे ढकलण्याबाबतीतील याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आता केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच सादर होण्याचा केंद्र सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.
- केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करतील.
- चार फेब्रुवारीपासून देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. उत्तरप्रदेश, पंजाब यांसारख्या महत्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यास मतदार प्रभावित होतील.
- तसेच त्यामुळे अर्थसंकल्प पुढे ढकलण्यात यावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तारखेलाच अर्थसंकल्प सादर होईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
- काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांनी देखील 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याबाबत आक्षेप घेतला होता.
Must Read (नक्की वाचा):
राज्यातील 42 पोलिसांना राष्ट्रपती पदक :
- देशभरातील सुरक्षा दलांत विशेष कर्तृत्व गाजविणाऱ्या जवान आणि अधिकाऱ्यांना प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून दरवर्षी राष्ट्रपती पदकांनी गौरविण्यात येते.
- यंदा देशभरातील 597 जणांची या पदकांसाठी निवड करण्यात आली असून त्यात राज्यातील 42 पोलिसांचा समावेश आहे.
- तसेच सीबीआय, बीएसएफ, सीआयएसएफ आदी केंद्रीय आस्थापनांमध्ये महाराष्ट्र विभागात कार्यरत असणाऱ्या सहा जणांनाही या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
- 24 जानेवारी रोजी या पदकांची घोषणा करण्यात आली. यात निवड झालेल्या राज्यभरातील 42 पैकी पोलिसांपैकी 29 जण मुंबई-पुण्यातील आहेत.
- तसेच 42 पैकी 39 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी, तर तिघांना उल्लेखनीय सेवेसाठी गौरविण्यात आले आहे.
परराष्ट्र सचिव जयशंकर यांच्या कार्यकाळात मुदतवाढ :
- भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
- परराष्ट्र सचिव म्हणून दोन वर्षे म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर जयशंकर हे या महिन्यात निवृत्त होणार होते. मात्र त्यांना आता जानेवारी, 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- जयशंकर यांनी 29 जानेवारी, 2015 रोजी परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जयशंकर यांनी अमेरिका व व चीनमधील भारतीय राजदूत याआधी काम केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांचे निकटवर्तीय मानले जातात.
- जयशंकर यांच्यानंतर परराष्ट्र सचिव पदाच्या स्पर्धेमध्ये सुजाता मेहता, अमर सिन्हा, नवतेज सरना, अनिल वधवा आणि रणजित राय या ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची नावे चर्चेमध्ये होती.
- जयशंकर यांच्या निवृत्तीस दोन दिवस राहिले असतानाच परराष्ट्र सचिवपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
‘सीआयए’चे नवे संचालक माईक पॉंपेओ :
- अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) संचालकपदाची शपथ माईक पॉंपेओ यांनी घेतली. पॉंपेओ हे ‘कॉंग्रेस’चे माजी सदस्य आहेत.
- “जगामधील सर्वश्रेष्ठ गुप्तचर खात्याचे नेतृत्व आता तुम्ही करणार आहात. तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारे स्त्री व पुरुष हे धैर्य या शब्दाला खरा अर्थ प्राप्त करुन देत असतात,” असे गौरवोद्गार अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी या प्रसंगी बोलताना काढले.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या पॉंपेओ यांच्या नावास सिनेटने सहमती दर्शविली.
- पॉंपेओ यांच्या नावास डेमोक्रॅटिक पक्षाने विरोध दर्शविला होता. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपासंदर्भात पॉंपे यांची भूमिका पारदर्शी नसल्याची टीका डेमोक्रॅटिक पक्षाकडून करण्यात आली होती.
- पॉंपेओ हे कॅन्सासमधील रिपब्लिकन नेते आहेत. जागतिक राजकारणामध्ये अमेरिकेपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होत असताना सीआयएच्या नव्या भूमिकेबद्दल अत्यंत उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर पॉंपेओ यांची ही निवड अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.
दिनविशेष :
- चिपळूणकरांच्या ‘निबंधमाला’ या मासिकाचा 25 जानेवारी 1874 रोजी प्रारंभ झाला.
- 25 जानेवारी 1971 रोजी हिमाचल प्रदेशला राज्याचा दर्जा देण्यात आला.
- विनोबा भावे यांना 25 जानेवारी 1982 रोजी ‘भारतरत्न’ पदवी प्रदान करण्यात आली.
- 25 जानेवारी 1988 रोजी पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- मोरारजी देसाई यांना 25 जानेवारी 1991 रोजी ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा