Current Affairs of 10 March 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 मार्च 2017)
पद्माकर शिवलकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान :
- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फिरकी गोलंदाक रविचंद्रन आश्विन यांना 2015-16 मोसमातील शानदार कामगिरीच्या प्रदर्शनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविले.
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी पॉली उम्रीगर पुरस्कार विराट कोहलीला प्रदान करण्यात आला.
- तसेच या वेळी माजी दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या हस्ते सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- विशेष म्हणजे, कोहलीने तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यात केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आश्विनने प्रतिष्ठेचा दिलीप सरदेसाई पुरस्कार पटकावला.
Must Read (नक्की वाचा):
विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक दीड वर्षांसाठी निलंबित :
- सैनिक व त्यांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांना 9 मार्च रोजी दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याच्या चौकशीसाठी दहा जणांची समिती नेमण्यात आली आहे.
- परिचारक यांना निलंबित करत असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. विधान परिषदेत सभागृह नेता चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाबाबत वक्तव्य केले होते.
- विरोधकांनी परिचारकांच्या तातडीच्या निलंबनाची मागणी लावून धरल्याने सलग तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले होते.
- आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सैनिकांच्या पत्नींच्या चारित्र्याविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अधिवेशनात उमटत होते. अखेर सरकारने परिचारक यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला.
मोहन भागवत यांना डॉक्टरेट पदवी बहाल :
- महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डीएससी) पदवी महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते बहाल करण्यात आली.
- तसेच यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन व दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भारतीय कृषी अनुसंधान व कृषी संशोधन, शिक्षण विभागाचे महासंचालक डॉ.त्रिलोचन मोहपात्रा, कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा उपस्थित होते.
- मोहन भागवत म्हणाले, माफसू विद्यापीठात मी चार वर्षे शिक्षण घेतले. या चार वर्षांत जीवनाचे गणित आणि पशू पक्षांच्या सेवेचे बहुमूल्य शिक्षण मिळाले.
- यापूर्वी पशुवैद्यक क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नव्हता. आता मात्र महत्त्व वाढले असून देश आणि राष्ट्राच्या विकासात या विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
ज्येष्ठ नाट्य समीक्षक वि.भा. देशपांडे कालवश :
- ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे तथा वि.भा. देशपांडे (वय 78) यांचे 9 मार्च रोजी निधन झाले.
- डॉ. देशपांडे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक, विशेषत: नाट्यक्षेत्रात कार्यरत होते. मराठी नाट्यकोश या सुमारे 1200 पानी ग्रंथांचे लिखाण व संपादन करुन मराठी वाड.मयात त्यांनी मोलाची भर टाकली.
- वि.भा. देशपांडे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष होते. 2006 मध्ये निवडून आलेल्या परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये ते प्रमुख कार्यवाह होते. कार्याध्यक्ष गं. ना. जोगळेकर यांच्या निधनानंतर कार्याध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली.
- तसेच पुण्यात 2010 मध्ये झालेल्या 83व्या साहित्य संमेलनातून शिल्लक राहिलेला 82 लाख रुपयांचा निधी साहित्य परिषदेला मिळवून देण्यात त्यांचा प्रमुख हातभार होता.
दिनविशेष :
- 10 मार्च 1897 हा सावित्रीबाई फ़ुले यांचा स्मृतीदिन आहे.
- 10 मार्च 1952 रोजी पिंपरी येथे हिंदूस्थान अॅंटिबायोटिक्स या पेनिसिलिन कारखान्याचे काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
- सन 1969 मध्ये अतिशय हुषार व धाडसी वृत्तीची महिला गोल्डा मायर यांची इस्त्राईलच्या पंतप्रधानपदावर नियुक्ती झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा