Current Affairs of 16 May 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 मे 2017)
भारतीय महीला क्रिकेट टीमची विश्वविक्रमाला गवसणी :
- भारतीय महीला क्रिकेट टीमने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात दीप्ती शर्मा आणि पूनम राउत या दोघींनी इतिहास रचला आहे. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 320 धावांची भागीदारी केली.
- आंतरराष्ट्रीय महीला एकदिवसीय क्रिकेटमधील ही कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे.
- दीप्ती शर्माने 188 धावांची खेळी केली मात्र, महीला क्रिकेटमध्ये व्दिशतक झळकविणारी दुसरी महिला खेळाडू होण्याची तिची संधी हुकली.
- दीप्तीने केलेल्या 188 धावा हा भारतीय महीला क्रिकेटमधला नवा विक्रम ठरला. शिवाय महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या ठरली आहे.
Must Read (नक्की वाचा):
गोवा टुरिझमची ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवा :
- गोव्यातील पर्यटनाला चांगला वाव मिळावा म्हणून गोवा पर्यटन विभागातर्फे नवीन बससेवेची सुरुवात करण्यात आली.
- बहुप्रतिक्षित अशा ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवेचा गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगांवकरांच्या हस्ते पंजिम येथील पर्यटन भवनात शुभारंभ करण्यात आला.
- गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना या बसमधून प्रवास करत गोव्यातील विविध पर्यटनस्थळांना भेट देता येईल.
- पुणेस्थित ‘प्रसन्न पर्पल ग्रुप’च्या सहयोगाने गोवा पर्यटन विकास महामंडळाने या आरामदायी आणि अलिशान बससेवेची सुरुवात केली आहे.
- ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ (एचओएचओ – होहो) नावाने सुरू झालेल्या या लाल रंगाच्या शाही बसमध्ये बसवून पर्यटकांना गोव्याची सफर घडविण्यात येईल. ‘ओपन टॉप डबल डेकर’ आणि ‘हायडेक’ स्वरुपातील या बस आहेत.
ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर कालवश :
- जेष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे 15 मे रोजी दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.
- गेली सत्तर वर्षांहून अधिक वर्षे नाट्यव्यवसायात रंगभूषेची धुरा समर्थपणे सांभाळणारे रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे मूत्रपिंडाच्या विकाराने मुंबईत निधन झाले.
- वयाच्या अकराव्या वर्षांपासून ‘रंगभूषाकार’ म्हणून बोरकर यांचा प्रवास सुरू झाला. वयोपरत्वे रंगभूषेच्या कामातून निवृत्ती पत्करल्यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या ‘अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या अभ्यासक्रमात ‘रंगभूषा’ हा विषय प्रात्यक्षिकासह शिकवण्याचे काम ते करत. बोरकर कुटुंबीय खरे तर गोव्यातील बोरी गावचे. पण पोर्तुगीजांच्या काळात काही मंडळींनी तिथून स्थलांतर केले आणि बोरकर रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिंचखरी गावी आले.
- 1992 च्या 24व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेवेळी उत्कृष्ट रंगभूषाकार म्हणून पारितोषिक, गुडबाय डॉक्टर या नाटकातील मधुकर तोरडमल यांच्या रंगभूषेकरिता नाट्यदर्पण पुरस्कार, भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांशिवाय अनेक अन्य संस्थांनी त्यांना सन्मान आणि पुरस्कार दिले.
लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल स्थानावर :
- जगभरात प्रत्येक देशाचा शस्त्रास्त्रांच्या भंडारातून स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही सर्व देशांमध्ये अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचे समोर आले आहे.
- अमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीने स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे.
- तसेच या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण 51 मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो.
- अमेरिका स्वतःच्या संरक्षणासाठी जवळपास 600 बिलियन डॉलर एवढा खर्च करतो. तर रशिया एका वर्षात जवळपास 54 बिलियन डॉलर खर्च करतो, चीन 161 बिलियन डॉलर खर्च करतो.
दिनविशेष :
- महान गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म 16 मे 1824 मध्ये झाला.
- 16 मे 1944 मध्ये महाराष्त्रातील एक प्रसिध्द लोकनेते अभयसिंह राजे भोसले यांचा जन्म झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा