मृदा आरोग्य पत्रक योजना (Soil Health Card Yojana)
मृदा आरोग्य पत्रक योजना (Soil Health Card Yojana)
योजनेची सुरुवात – मृदा आरोग्य पत्रक योजनेची सुरुवात 17 फेब्रुवारी, 2015 रोजी राजस्थानच्या सूरतगडमधून कृषी कर्मण पुरस्कार वितरण प्रसंगी करण्यात आली.
मृदा आरोग्य पत्रक योजनेचे घोषवाक्य – “स्वस्थ धारा, खेत हरा”.
Must Read (नक्की वाचा):
मृदा आरोग्य पत्रक योजनेचा प्रमुख उद्देश –
1. खताचा अनियंत्रित वापर थांबविणे हा आहे.
2. मृदा आरोग्य पत्रक योजनेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी देशभरातील शेती क्षेत्रामधील मृदेच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले.
3. मृदा आरोग्य पत्रक योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांमध्ये 14 कोटी मुदा आरोग्य पत्रके वाटप केली जातील.
4. मृदा परीक्षण म्हणजे पिकाच्या वृद्धी व विकासासाठी आवश्यक पोषक तत्वांची उपलब्ध मात्रेचे रासायनिक परीक्षण आकलन त्याचबरोबर मृदेची गुणवत्ता, क्षार प्रमाण व आम्ल प्रमाण इ.चे परीक्षण करणे होय.
5. मृदा आरोग्य पत्रक योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतजमिनीतील मातीचे परीक्षण करू शकेल.
6. मृदा आरोग्य पत्रक योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना पिकांच्या हिशोबाने खतांचा वापर करण्याची सुविधा मिळेल.
7. मृदा आरोग्य पत्र (कार्ड) मृदा परीक्षणानंतर लागू केले जाईल.
8. मृदा आरोग्य पत्रक योजनेस 568.54 कोटी रु. खर्चाबरोबर 12 व्या पंचवार्षिक योजनेत कार्यवाहिस परवानगी देण्यात आली आहे.
9. मृदा आरोग्य पत्रक योजनेत मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना मदत करणार आहे. यासाठी केंद्र व राज्यांच्या वित्तीय हिस्स्यांचे प्रमाण 75:25 असे राहणार आहे.