Current Affairs of 11 July 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (11 जुलै 2017)
पनवेलच्या महापौरपदी कविता चौतमोल यांची निवड :
- पनवेल शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमोल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची घोषणा पीठासन अधिकाऱ्यांनी केली.
- पनवेल महापालिकेच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या पहिल्या विशेष महासभेत ही घोषणा करण्यात आली.
- शेकापच्या महापौरपदाच्या उमेदवार हेमलता गोवारी व उपमहापौरपदाचे उमेदवार रवींद्र भगत यांनी उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
- तसेच रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
Must Read (नक्की वाचा):
ब्रिटिश कौन्सिल इंडियाचे ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार :
- मुंबईत शिक्षण, पर्यटन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल इंडियाने ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दोन संस्थांकडून विविध क्षेत्रांत विकासासाठी प्रकल्प व उपक्रम राबविले जाणार आहेत.
- शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन कौशल्याच्या संवर्धनावर तसेच महानगर क्षेत्रातील स्वस्त खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल.
- अध्यापन कौशल्य व मिळणारे शिक्षण यांत सुधारणा करण्यासाठी कौशल्य विकास आणि भाषा प्रावीण्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले जातील. हे कार्यक्रम प्रत्यक्ष व डिजिटल अशा दोन्ही स्वरूपांत चालवले जातील, त्यामध्ये सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा समावेश केला जाईल, अशी माहिती ब्रिटिश कौन्सिलकडून देण्यात आली आहे.
- भारतात येणाऱ्या पर्यटकांची मुंबई महानगर क्षेत्र हीच पहिली पसंत ठरावी, यासाठी क्षेत्रातील रचनात्मक आणि सांस्कृतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा या कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर कालवश :
- ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे 10 जुलै रोजी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.
- मंगेश तेंडुलकर यांचे 90वे व्यंगचित्रप्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात पार पडले होते.
- शेवटच्या दिवसांमध्येही त्यांहे व्यंगचित्र काढणे सुरूच होते. 1954 मध्ये त्यांनी पहिले व्यंगचित्र काढले होते.
- विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते.
- तसेच तेंडुलकर नाट्यसमीक्षकही होते. विनोदी आणि थोड्या तिरकस शैलीतील त्यांची नाट्य समीक्षा वाचनीय आहे. त्यांची स्वारी बुलेटवर बसून निघाली की भल्याभल्यांना आश्चर्य वाटायचे.
- व्यंगचित्रांमधून पुण्यातील वाहतूक कोंडी व बेशिस्त यावर त्यांनी प्रहार केला. बोचऱ्या, मार्मिक पुणेरी भाष्य करणाऱ्या या व्यंगचित्रांनी वाहतूक शाखेला मदतही केली.
अलिबाग नगरपालिकेकडून सर्वेक्षण सुरू :
- पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बेघरांना घर मिळावे यासाठी अलिबाग नगरपालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.
- तसेच योजनेची नागरिकांना माहिती मिळावी यासाठी प्रभागांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत.
- नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, यासाठी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन नगरसेवक उमेश पवार यांनी केले.
- नगरसेवक उमेश पवार यांनी यामध्ये पुढाकार घेत प्रथम सभा बोलावून नागरिकांना योजनेची माहिती दिली.
- तांत्रिक सल्लागार म्हणून सरकारने चेतन सोनार यांची नेमणूक केली आहे. त्यांची टीम शहरामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहे, तसेच योजना समजावून सांगून नागरिकांच्या शंकांचेही निरसन त्यांच्यामार्फत केले जात आहे.
- राज्यातील 17 ठिकाणचे काम त्यांना देण्यात आलेले आहे. सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा विकास आराखडा सरकारला सादर केला जाणार आहे. तो मंजूर झाल्यावर योजना मूर्तरूप घेणार आहे.
दिनविशेष :
- 11 जुलै हा दिवस (संयुक्त राष्ट्रे) जागतिक लोकसंख्या दिन आहे.
- 18 महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस 11 जुलै 2003 रोजी पुनः सुरू झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा