Current Affairs of 12 July 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (12 जुलै 2017)
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री :
- बीसीसीआयने 11 जुलै रोजी रात्री रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदाची जबाबदारी सोपविली.
- माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हे संघाचे गोलंदाजी कोच असतील. याशिवाय राहुल द्रविड यांच्याकडे विशिष्ट परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागाराची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- राहुल द्रविड हे भारतीय ‘अ’ आणि 19 वर्षांखालील मुलांच्या संघाचेसुद्धा मुख्य मार्गदर्शक आहेत.
- बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करताना सांगितले, की क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) शिफारशींवर आम्ही शास्त्री यांना मुख्य कोच नेमण्याचा निर्णय घेतला. झहीर खान हे पुढील दोन वर्षांसाठी गोलंदाजी कोच असतील.
- तसेच भारताकडून 2014 मध्ये अखेरचा सामना खेळणारा झहीर खान हा भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज मानला जातो.
Must Read (नक्की वाचा):
गोपालकृष्ण गांधी उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार :
- उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या आखाड्यात 18 विरोधी पक्षांच्या वतीने पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी उतरणार आहेत.
- गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीला सर्व 18 विरोधी पक्षांनी संमती दिली. त्यात जनता दलाचा (यु) समावेश आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत या पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे.
- गोपालकृष्ण गांधी हे महात्मा गांधी यांचे व देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचे नातू आहेत.
एकदिवसीय क्रमवारी विराट कोहली प्रथमस्थानी :
- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखले आहे.
- तर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तीन स्थानांनी प्रगती करत 12 वे स्थान पटकावले आहे.
- नवीन जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत आघाडीचे पाच फलंदाज, पाच गोलंदाज आणि पाच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बदल झालेला नाही.
- विराट फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. तर त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स आणि इंग्लंडचा जो रूट आणि बाबर आझम यांचा नंबर आहे.
जम्मू काश्मीरमधील सरकार बरखास्त करणार :
- जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला आहे.
- अमरनाथ यात्रेवर अनंतनागमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे अपयश पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे.
- तसेच या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जम्मू काश्मीरमधील सरकारला घरचा आहेर दिला आहे.
- जम्मू काश्मीरमधील सरकार बरखास्त करण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली.
- जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीचे सरकार आहे. मात्र जम्मू काश्मीरमधील राज्य सरकार बरखास्त करुन तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
दिनविशेष :
- 12 जुलै 1864 रोजी मराठी इतिहास संशोधक इतिहासाचार्य ‘वि.का.राजवाडे’ यांचा जन्म झाला.
- भारताचे माजी सरन्यायाधीश ‘यशवंत विष्णू चंद्रचूड’ यांचा जन्म 12 जुलै 1920 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा