प्रधानमंत्री प्रकाश पथ योजना (उजाला योजना) (Pradhan Mantri Prakash Path Yojana)
प्रधानमंत्री प्रकाश पथ योजना (उजाला योजना) (Pradhan Mantri Prakash Path Yojana)
*देशात ऊर्जा संवर्धंनासाठी सुरू करण्यात आलेल्या LED आधारित घरगुती कार्यक्षम प्रकाश कार्यक्रमांचे नामकरण उजाला योजना असे करण्यात आले आहे.
*उजाला म्हणजे Unnat Jyoti by Affordable LEDs for All.
*उजाला योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्यातील भोपाळामधून करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
*उजाला योजनेची कार्यवाही केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ‘Energy Efficiency Services Limited (EESL) कंपनीव्दारे 125 हून अधिक शहरांमध्ये राबविण्यात येत आहे.
उजाला योजनेचा उद्देश –
1. देशात वापरात असणारे 77 कोटी तापदीप्त दिव्यांच्या (Incandescent Lamps) जागी LED दिवे बसविणे.
2. उजाला योजनेअंतर्गत वापरात येणार्या बल्बची पॉवर 9 वॅट इतकी असून या बल्बची वॉरंटी 3 वर्षे एवढी आहे.
3. LED बल्ब बाजारात 160 रु. किंमतीस उपलब्ध होतील; परंतु BPL कार्डधारकास तो 85 रुपयांस उपलब्ध होईल.
उजाला योजनेची वैशिष्ट्ये –
1. या योजनते प्रत्येक वर्षी 20 हजार मेगावॅट ऊर्जा बचत होईल.
2. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी 9 कोटी बल्बचे वितरण करण्यात येईल.
3. या योजनेअंतर्गत जे बल्ब वितरित केले जातात ते बल्ब इतर बल्बच्या तुलनेत 10% अधिक प्रकाश देतात.
उजाला योजना पात्रता –
1. उजाला योजनेअंतर्गत LED बल्ब मिळवण्यासाठी कोणकोण पात्र आहेत?
2. असे सर्व ग्राहक, ज्यास विद्युत वितरण कंपनीने मीटरव्दारे वीज कलेक्शन दिले आहे.
3. ग्राहक EMI पेमेंट (वीज बिलात मासिक/व्दिमासिक हप्त्यावर) वर किंवा अग्रीम पेमेंट करून LED प्राप्त करू शकतात.
*उजाला कॅश बोर्डमध्ये पांढरा आणि निळा रंग खालील राज्यांचे प्रतिनिधित्व करतो.
निळा रंग –
निळा रंग अशा राज्यांचे प्रतिनिधित्व करतो, जेथे उजाला वितरण योजना सुरू करण्यात आली आहे आणि ग्राहकांसाठी ही योजना लागू झाली आहे.
पांढरा रंग –
पांढरा रंग अशा अशा राज्यांचे प्रतिनिधित्व करतो, जेथे उजाला योजना लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.