विकल्प योजना (Vikalp Yojana)
विकल्प योजना (Vikalp Yojana)
*भारतीय रेल्वेव्दारे तिकीट आरक्षणासाठी लागणार्या वेटिंग लिस्टची समस्या कमी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट तत्वावर विकल्प योजना 1 नोव्हेंबर 2015 रोजी सुरू करण्यात आली.
*पायलट तत्वावर विकल्प योजना प्रथम दिल्ली-लखनऊ आणि दिल्ली-जम्मू रेल्वेमार्गांवर सुरू करण्यात आली.
Must Read (नक्की वाचा):
*विकल्प योजनेचा लाभ ऑनलाईन बुकिंग करण्यात आलेल्या तिकीटांवर मिळू शकेल.
*विकल्प सेवेसाठी यात्रीस ऑनलाईन बुकिंग दरम्यान Alternate Train Accommodation Scheme ची निवड करणे आवश्यक राहील.
*विकल्प योजनेअंतर्गत आरक्षणादरम्यान जर एखाद्या यात्रीस वेटिंग लिस्टमध्ये स्थान मिळाले तर त्यास दुसर्या पर्यायामध्ये रेल्वेमध्ये कन्फर्म (फिक्स) जागा उपलब्ध केली जाईल. रेल्वे मंत्रालय या योजनेअंतर्गत या रेल्वेमार्गावर पर्याय रेल्वेस पहिल्या रेल्वेपासून अर्ध्या तासापासून 24 तासांपर्यंत चालवेल. या सेवेसाठी रेल्वे मंत्रालयाव्दारे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकरण्यात येणार नाही.
*पायलट प्रोजेक्ट तत्वावर दिल्ली-लखनऊ, दिल्ली-जम्मू मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या विकल्प योजनेचा विस्तार करून ही योजना आणखी तीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहे.
1. दिल्ली-चेन्नई
2. दिल्ली-हावडा
3. दिल्ली-बंगळूरु
*विकल्प योजनेचा फायदा घेण्यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर तिकीट बुकिंग करावे लागेल.
*विकल्प योजनेअंतर्गत 20 रुपये अधिक वेतन देऊन यात्री 10 लाख रूपयांचा अतिरिक्त लाभ घेऊ शकतो. यास “रिझर्व्हेशन लिंक्ड इन्श्योरंस प्लॅन” असे नाव देणयत आले आहे. या प्लॅनची संपूर्ण जबाबदारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कोर्पोरेशन (IRCTC) वर सोपविण्यात आली आहे.
*रिझर्व्हे लिंक्ड इन्श्योरंस प्लॅन अंतर्गत 20 रुपयांच्या अतिरिक्त पेमेंटमध्ये दुर्घटनेत मृत्यू झाल्यास 10 लाख रु., पूर्ण अपंगत्व आल्यास 7.5 लाख रु., आंशिक अपंगत्वास 5 लाख रु. इन्श्योरंस भरपाई स्वरुपात मिळतील.
*विकल्प योजनेचा लाभ एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट रेल्वे अंतर्गत देण्यात येईल.