राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (Rashtriyaa Madhyamik Shiksha Abhiyan)
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (Rashtriyaa Madhyamik Shiksha Abhiyan)
Must Read (नक्की वाचा):
उद्दिष्ट्ये –
- माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढविणे व त्यांचा शिक्षणातील दर्जा वाढविणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.
- 2017 पर्यंत माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करून समाजांच्या सर्व स्तरांवर शिक्षण पोहचविणे.
- माध्यमिक शिक्षण देणार्या शाळांचा दर्जा सुधारणे.
- माध्यमिक शिक्षण घेताना लिंगभेद, सामाजिक आर्थिक दुर्बलता व अपंगत्व यासारख्या अडचणी दूर करून दर्जेदार माध्यमिक शिक्षण देणे.
- 2020 पर्यंत सर्वत्र माध्यमिक शिक्षणाचा प्रसार करून सर्वाधिक धारकतेचे उद्दिष्ट पूर्ण करणे.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणार्या सुविधा –
- या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी त्यांची बैठक व्यवस्था योग्यरीत्या करण्यासाठी अतिरिक्त वर्ग खोल्या निर्माण केल्या जातील.
- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करून त्यांचा विकास करण्यासाठी प्रयोगशाळा निर्माण केल्या जातील.
- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना अधिकाधिक ज्ञान संपादन करण्यासाठी प्रत्येक माध्यमिक शाळेत वाचनालय सुरू केले जाईल.
- या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कला व हस्तकला वर्गांची सुविधा पुरविली जाईल.
- या अभियानांतर्गत प्रत्येक माध्यमिक शाळांमध्ये प्रसाधनगृहे/शौचालयाची सुविधा पुरविली जाईल.
- या अभियानांतर्गत स्वच्छ पेयजलाची सुविधा प्रत्येक माध्यमिक शाळांमध्ये पुरविली जाईल.
- या अभियानांतर्गत दुर्गम भागातील माध्यमिक शाळांमध्ये शिकवणार्या शिक्षकांसाठी निवासी वसतिगृहाची सुविधा पुरविली जाईल.
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत माध्यमिक शाळांचा व शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी पुरवल्या जाणार्या सेवा-सुविधा –
- प्रत्येक विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास करण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी प्रमाण 30:1 ठेवणे, यासाठी अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक केली जाईल.
- कौशल्यपूर्ण ज्ञान देणार्या शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिले जाईल.
- या अभियानांतर्गत विज्ञान, गणित व इंग्रजी विषयांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जाईल.
- प्रत्येक माध्यमिक शाळेमध्ये सर्व साहित्यांने परिपूर्ण अशी वैज्ञानिक प्रयोगशाळा निर्माण केली जाईल.
- या अभियानांतर्गत प्रत्येक माध्यमिक शाळेमध्ये माहिती तंत्रज्ञानवर आधारित शिक्षण दिले जाईल.
- कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी जुन्या अभ्यासक्रमामध्ये बदल करून नवीन अभ्यासक्रम तयार केला जाईल.
- या अभियानांतर्गत कौशल्यपूर्ण माध्यमिक शिक्षण देण्यासाठी अध्ययन-अध्यापनाच्या पद्धतीमध्ये बदल केले जातील.
या अभियानांतर्गत सार्वत्रिक समान विकास करण्याच्या दृष्टीने पुढील सुधारणा केल्या जातील –
- या अभियानांतर्गत माध्यमिक शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविणे यासाठी सूक्ष्म नियोजन-व्यवस्थापनावर विशेष भर दिला जाईल.
- या अभियानांतर्गत आश्रमशाळांना देण्यात येणार्या सोयी-सुविधांवर विशेष भर दिला जाईल.
- आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रवेशासाठी विशेष मोहीम राबविली जाईल.
- नवीन शाळा सुरू करताना अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती यासारखे अल्पसंख्यांक जिथे राहतात, त्या भागाला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाईल.
- मुलींची प्रवेशसंख्या वाढविण्यासाठी शाळांमध्ये अधिक स्त्री-शिक्षकांची नियुक्ती केली जाईल.
- मुलींसाठी प्रत्येक शाळेमध्ये स्वतंत्र शौचालये निर्माण केली जातील.