Current Affairs of 22 July 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (22 जुलै 2017)
केंद्र सरकारमार्फत देशात 42 मेगा फूड पार्क मंजूर :
- देशामध्ये एकूण 42 मेगा फुड पार्क मंजूर करण्यात आले असून त्यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. तर 33 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर बादल यांनी दिली.
- केंद्रीय मंत्री कौर म्हणाल्या की, आपला देश अन्न धान्य आणि दूध उत्पादनात जागतिक स्तरावर अग्रेसर आहे. देशात सुमारे एक लाख कोटी रुपयांचे अन्न वाया जाते. ही खेदाची बाब असून अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे गरजू आणि भुकलेल्यांना अन्न मिळेल.
- तसेच पुढील दोन वर्षांत शीतसाखळी प्रयोगाचे 100 प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून किसान संपदा योजना तयार करण्यात आली आहे.
- केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागामार्फत नवी दिल्ली येथे 3 ते 5 नोव्हेंबर 2017 दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2017 चे आयोजन करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):
इस्त्रोकडून 29 नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण :
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 61 लाख युरोंची कमाई केली आहे.
- मागच्या चारवर्षात अँट्रीक्सने परदेशी उपग्रहाच्या प्रक्षेपणातून 1 कोटी 57 लाख युरोची कमाई केली आहे.
- 2017 सालच्या पहिल्या सहा महिन्यात इस्त्रोने 130 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोने जे परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले ते आकाराने छोटे होते.
- पुढच्या काहीवर्षात इस्त्रो उपग्रहांच्या लाँचिंगसाठी अँट्रीक्सला दोन स्वतंत्र प्रक्षेपक उपलब्ध करुन देईल असा विश्वास इस्त्रोचे चेअरमन एएस किरण कुमार यांनी व्यक्त केला.
- सध्या भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण ही इस्त्रोची पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे प्रक्षेपकांमध्ये जी अतिरिक्त जागा उरते ती परदेशी उपग्रहांसाठी राखून ठेवली जाते. याच अतिरिक्त जागेतून अँट्रीक्स नफा कमवत आहे.
- इस्त्रोने अलीकडे कार्टोसॅट-2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले. यावेळी प्रक्षेपकामध्ये कार्टोसॅट मुख्य प्रवाशी तर, अन्य परदेशी उपग्रह सहप्रवासी होते.
- ऑस्ट्रीया, चिली, बेल्जियम, फ्रान्स, फिनलँड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, इटली, अमेरिका, लाटीवा, स्लोव्हाकिया आणि यूके या देशांचे नॅनो उपग्रह होते.
114 पाकिस्तानी लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल :
- पाकिस्तानातल्या 114 लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
- नंदलाल मेघानी, डॉ. विशनदास मनकानी आणि किशनलाल अडानी यांचाही भारतीय नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तींमध्ये समावेश आहे. या पाकिस्तानी नागरिकांना भारताच्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहे.
- अहमदाबादचे 50 वर्षीय नंदलाल मेघानी 16 वर्षांपूर्वीच पाकिस्तानातील सिंध प्रांतातून पत्नी आणि मुलीसह भारतात आले.
- भारतात नवी सुरुवात करण्यासाठी त्यांनी तिथले घर आणि व्यवसाय विकून टाकला. आम्ही भारतात सामान्य नागरिक जगत असलेल्या राहणीमानामुळे प्रभावित झालो होतो.
- पाकिस्तानात वाढत चाललेल्या दहशतवाद्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या मुस्लिम मित्रांनी मला भारतात स्थायिक होण्याची सूचना केली होती. मेघानी हे पाकिस्तानमध्ये ऑटो पार्ट्सचा व्यवसाय करत होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवी निवृत्तीवेतन योजना :
- ज्येष्ठ नागरिकांसाठी नरेंद्र मोदी सरकारने आणखी एक नवी निवृत्तिवेतन योजना (पेन्शन प्लान) आणली असून त्यामध्ये दहा वर्षांच्या कालावधीसाठी आठ टक्क्यांचा (वार्षिक दर 8.30 टक्के) व्याजदर मिळणार आहे. व्याजदरांची घसरण चालू असताना ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक पर्याय देणारी असू शकते.
- आठ टक्क्यांचा घोषित व्याजदर आणि ‘एलआयसी’ला प्रत्यक्षात देता येणारा व्याजदर यांच्यातील फरकाची रक्कम केंद्र सरकार भरणार आहे.
- एलआयसीच्या कोष्टकानुसार, दरमहा एक हजार रुपये निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी दीड लाख, तर पाच हजार रुपये मिळविण्यासाठी साडेसात लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी 3 मे 2018 पर्यंतची मुदत आहे. ही गुंतणवूक ऑनलाइन अथवा ऑफलाइनही करता येईल.
- तसेच तीन वर्षांनंतर 75 टक्के कर्जही काढता येईल. त्याशिवाय मुदतीआधीच योजना बंद करता येऊ शकते. त्या स्थितीमध्ये गुंतवलेल्या रकमेच्या 98 टक्के रक्कम परत मिळेल.
दिनविशेष :
- ‘अलेक्झांडर मॅकेंझी’ सन 1793 मध्ये 22 जुलै रोजी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय ठरला.
- 22 जुलै 1918 हा भारतीय वैमानिक ‘ईंद्रलाल रॉय’ यांचा स्मृतीदिन आहे.
- भारतीय पार्श्वगायक मुकेश यांचा जन्म 22 जुलै 1923 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा