Current Affairs of 8 August 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2017)
राजीवकुमार यांची निती आयोग उपाध्यक्षपदी नियुक्ती :
- निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ राजीवकुमार यांची नियुक्ती झाली आहे. अरविंद पंगारिया यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.
- राजीवकुमार यांच्याबरोबरच ‘एम्स’मधील बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख विनोद पॉल यांचीही निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
- राजीवकुमार हे धोरण आणि संशोधन विभागाचे वरिष्ठ फेलो होते. कुमार यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी.फिल आणि लखनौ विद्यापीठातून पी.एच.डी. प्राप्त केली आहे.
- 2006 ते 2008 या काळात राजीवकुमार हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचेही सदस्य होते.
- तसेच विविध वित्तसंस्थांमध्ये त्यांनी वरीष्ठ पदांवर काम केले आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली आहेत.
Must Read (नक्की वाचा):
कॉंग्निझंट मधील 400 वरिष्ठांना निवृत्ती :
- माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील ‘कॉंग्निझंट’ कंपनीने वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिल्यानंतर कंपनीच्या 400 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे.
- ‘आयटी’ क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे ‘कॉंग्निझंट’ने मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
- अमेरिकेच्या ‘नॅस्डॅक’मध्ये नोंदणीकृत असलेल्या कॉग्निझंट कंपनीचे बहुतांश कामकाज तमिळनाडू राज्यातून चालते.
- ‘कॉग्निझंट’कडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने संचालक पातळीपासून ते वरिष्ठ उपाध्यक्षपदी असलेल्या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय खुला ठेवला होता.
- तसेच वरिष्ठ स्तरावरील ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन 40 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशांसाठी देखील हा पर्याय खुला होता, असे सूत्रांनी सांगितले.
- 31 डिसेंबर 2016च्या प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, ‘कॉग्निझंट’मध्ये जगभरात दोन लाख 60 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी एक लाख 88 हजार, म्हणजेच एकूण मनुष्यबळाच्या 72 टक्के कर्मचारी भारतात काम करतात.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भीमराव गस्ती कालवश :
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचे 8 ऑगस्ट रोजी निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
- गस्ती यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी, यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. देवदासी महिलांच्या प्रश्नांसाठी आणि बेरड-रामोशी समाजाच्या विकासासाठी ‘उत्थान’ ही सामाजिक संस्था त्यांनी बेळगावमधील यमुनापूर येथे सुरू केली.
- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार होता.
- बेरड (आत्मकथन) आणि आक्रोश या त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. सांजवारा हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे.
- पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी आणि स्व-रूपवर्धिनी या संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. तसेच भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान या संस्थेचे ते अनेक वर्षे उपाध्यक्ष होते.
दिनविशेष :
- सन 1509 मध्ये 8 ऑगस्ट रोजी सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना झाली.
- 8 ऑगस्ट 1932 रोजी मराठी लोकप्रिय अभिनेते ‘दादा कोंडके’ यांचा जन्म झाला.
- सन 1949 मध्ये 8 ऑगस्ट रोजी भुतानच्या राष्ट्राची स्थापना करण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा