Current Affairs of 24 September 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (24 सप्टेंबर 2017)
उत्तर कोरियानंतर आता इराणचे अमेरिकेला आव्हान :
- उत्तर कोरियानंतर आता इराणने अमेरिकेला आव्हान दिले असून इराणने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली.
- अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही इराणने क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
- हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. इराणने नियमाला अनुसरुनच क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा केला आहे.
- तर इराणने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केला असा अमेरिकेचा दावा आहे.
- जुलै 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे पाच कायम सदस्य, युरोपियन युनियन आणि इराण यांच्यात अणुप्रश्नाविषयी सर्वसहमती झाली होती.
- यानंतर इराणवरील आर्थिक आणि राजकीय बंधने उठवण्यात आली होती.
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच इराणवर निर्बंध घालणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती.
- यानुसार इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात मदत करणारे आणि या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी आर्थिक हितसंबंध असलेल्यांना आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता
Must Read (नक्की वाचा):
पाकिस्तानकडून अरबी समुद्राच्या उत्तर भागात क्षेपणास्त्र चाचणी :
- पाकिस्तानच्या नौदलाने अरबी समुद्राच्या उत्तर भागात एका क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.
- ‘एअर टू सरफेस’ अर्थात हवेतून जहाजाकडे मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.
- अँटी शिप मिसाईलची (जहाज नष्ट करणारे क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी करण्यात आली.
- या क्षेपणास्त्राची चाचणी एका हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आली असल्याची माहिती पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्याने दिली आहे.
- हेलिकॉप्टरद्वारे या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याने आम्हाला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी चांगली मदत होऊ शकणार आहे असेही नौदलाने म्हटले आहे.
- पाकिस्तानच्या युद्ध क्षमतेला या चाचणीमुळे वेगळी उंची लाभली आहे असेही नौदल अधिकारी जकाउल्लाह यांनी म्हटले.
निवडणुकांमध्ये आता व्हीव्हीपेएटीचा वापर होणार :
- गुजरात आणि हिमाचल प्रदेशात या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये व्होटर व्हेरिफिबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपेएटी)चा वापर करण्यात येणार आहे.
- मात्र, या दोन्ही राज्यांमध्ये या मतदान पावत्यांची मोजणी होईलच असे नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
- निवडणुकांमध्ये पूर्णपणे व्हीव्हीपेएटीचा वापर होणारी गुजरात आणि हिमाचल प्रदेश ही देशातील पहिली राज्ये ठरणार आहेत.
- यापूर्वी गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काही भागात व्हीव्हीपेएटीचा वापर करण्यात आला होता.
- गेल्या काही काळात सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे ईव्हीएम मशिन्सची विश्वासार्हता ढासळू लागली होती.
- त्यामुळेच निवडणूक आयोगाने आता अधिक काटेकोर धोरणे अवलंबली असून त्यासाठी नवे तंत्रज्ञानही वापरण्यात येणार आहे.
- या पार्श्वभूमीवर, व्हीव्हीपेएटीचा वापर केल्यास मतदात्याला आपण दिलेल्या मतदानाची पावती मिळणार आहे.
- यावर आपण कोणाला मतदान केले याची माहिती असणार आहे. यामुळे मतदान प्रक्रियेतील फेरफार रोखता येईल.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा