Current Affairs of 6 November 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (6 नोव्हेंबर 2017)
भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप जिंकला :
- भारतीय पुरुष, तसेच महिला हॉकी संघ एकाच वेळी आशिया विजेता असणे हा योग 13 वर्षांनी साधला गेला आहे. यापूर्वी हे 2004 मध्ये असे घडले होते; तर आता महिला संघाच्या यशामुळेच हे 13 वर्षांनी घडले आहे.
- जपानमध्ये 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या लढतीत भारतीय महिलांनी चीनचे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असे पराभूत करत विजेतेपद मिळविले.
- भारतीय पुरुष हॉकी संघाने 2003 मध्ये क्वालालंपूर आशिया कप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर एका वर्षाने भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदा आशिया कप जिंकला, त्या वेळी पुरुष विजेतेपद भारताकडेच होते. आता 13 वर्षांनी भारतीय महिला हॉकी संघ जिंकला. त्यापूर्वी केवळ 15 दिवसांपूर्वी भारतीय पुरुष संघाने ढाक्यात आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
- भारतीय महिलांनी यापूर्वी 2004 मध्ये भारतातच झालेल्या स्पर्धेत जपानचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. 2009 मध्ये विजेतेपदाच्या लढतीत चीनकडूनच झालेल्या पराभवाचा परतफेड या विजयाने केली. तसेच 1999 मध्ये देखील त्या उपविजेत्या राहिल्या होत्या.
Must Read (नक्की वाचा):
जगभरातील काळा पैसा उजेडात :
- नोटाबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त ‘अँटी ब्लॅक मनी डे’ साजरा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली असतानाच ‘पॅराडाईज पेपर्स’ उजेडात आले आहे.
- ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये बोगस कंपन्यांचा खुलासा करण्यात आला असून या कंपन्यांचा वापर जगातील श्रीमंत मंडळी परदेशात पैसे पाठवण्यासाठी करत होती. यामध्ये भारतातील दिग्गज नेते, सिनेसृष्टीतील कलावंत आणि उद्योजकांचे नावही समोर आले आहे.
- जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने भारतातील इंडियन एक्स्प्रेससह जगातील 96 नामांकित माध्यमसमूहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.
- ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये भारतातील 714 जणांचा समावेश आहे. कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर्म्युडामधील ‘अॅपलबाय’ या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची 13.4 दशलक्ष कागदपत्रे उघड करण्यात आली आहे.
- बर्म्युडामधील अॅपलबाय आणि सिंगापूरमधील एशियासिटी या कंपन्यांनी करनंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 19 ठिकाणांवरुन स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा फिरवल्याचा गौप्यस्फोट ‘पॅराडाईज पेपर्स’मधून करण्यात आला आहे. त्यातून जागतिक राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंतांनी आपली मालमत्ता लपवली आणि कर चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.
- तसेच 714 भारतीयांचा या यादीत समावेश असून ‘पॅराडाईज पेपर्स’मधील 180 देशांच्या यादीत भारत 19व्या स्थानी आहे.
सोलापूर विद्यापीठाचे नामांतर होणार :
- धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संवैधानिक तरतुदींचे पालन करीत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. धनगर आरक्षणाचा दिलेला शब्द पूर्ण करणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली.
- धनगर समाज संघर्ष समितीतर्फे 5 नोव्हेंबर रोजी स्नेहनगर मैदानावर आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात ते बोलत होते.
- केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, मत्स्य, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे, गणेश हाके उपस्थित होते.
- मुख्यमंत्री म्हणाले, यापूर्वी केंद्राला पाठविलेल्या शिफारसपत्रात धनगर आरक्षणासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करू शकत नसल्याचे नमूद करून समाजाची फसवणूक करण्यात आली. आता टीआयएसएसमार्फत सर्व पुराव्यांसह अहवाल तयार करण्यात येत आहे. डिसेंबरपर्यंत हा ऐतिहासिक अहवाल तयार होईल. त्यानंतर संवैधानिक तरतुदींचे पालन करून शिफारसपत्र केंद्राला पाठविण्यात येईल.
- लवकरच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आरक्षण मिळवून घेतले जाईल. हे आरक्षण देताना काही विघ्नसंतोषी लोकांकडून आदिवासींना भडकविण्याचे काम सुरू आहे; पण आदिवासी आरक्षणाला बाधा निर्माण न करता धनगर समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
टॉरेन्टला व्यवसायविक्रीस युनिकेम बोर्डाची मंजुरी :
- युनिकेम लॅबोरेटरिज लि.च्या भारत व नेपाळमधील औषध उत्पादन, विक्री व वितरणाच्या व्यवसायाची अनुषंगिक मालमत्ता व कर्मचा-यांसह टॉरेन्ट फार्मास्युटिकल्स लिमिटेडला विक्री व हस्तांतरण करण्याच्या व्यवहारास युनिकेम कंपनीच्या संचालक मंडळाने 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली.
- या व्यवहार एकूण 3,600 कोटी रुपयांचा असून त्यासंधीच्या अटी व शर्ती दोन्ही कंपन्यांनी वाटाघाटी करून याआधीच ठरविल्या असून त्यासंबंधीचे औपचारिक करार लवकरच केले जातील. या व्यहारामुळे युनिकेमचे भारत व नेपाळमधील अनेक ब्रॅण्ड, सिक्किममधील कारखाना व या व्यवसायाशी संबंधित कर्मचारी टॉरेन्ट कंपनीकडे हस्तांतरित होतील.
- भागधारकांच्या संमतीसह अन्य वैधानिक मंजुर्या मिळून डिसेंबर 2017 अखर हा व्यवहार पूर्ण होईल. त्यानंतरही युनिकेम ही शेअर बाजारातील लिस्टेट कंपनी म्हणून कायम राहील व तिच्या सध्याच्या भागभांडवल रचनेत त्याने काही फेरबदल होणार नाहीत, असे कंपनीने म्हटले आहे.
दिनविशेष :
- सन 1860 मध्ये 6 नोव्हेंबर रोजी अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
- दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना 6 नोव्हेंबर 1913 रोजी अटक झाली होती.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा