Current Affairs of 1 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2018)
जगाच्या तुलनेत भारतात आहेत सर्वाधिक महिला पायलट :
- जगभरात सर्वाधिक महिला पायलट या भारतातील आहेत असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले.
- महिलांचा विमान वाहतूक क्षेत्रातील सहभाग या क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहे.
- भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणार आहेत.
- अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग अशी या महिला वैमानिकांची नावं आहेत. या तिघींनी आपलं प्रशिक्षण नुकतंच यशस्वीरित्या पूर्ण केलं आहे.
- एका वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी जवळपास 15 कोटी खर्च येतो.
- इतिहासात पहिल्यांदाच महिला मिग-21 बिसन्स हे विमान उडवणार आहेत पण, त्या महिला आहेत म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं झुकतं माप देण्यात आलं नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
Must Read (नक्की वाचा):
अर्थसंकल्पात कृषी आणि आरोग्य क्षेत्र केंद्रस्थानी :
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या अखेरच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्य नागरिक, शेतकरी वर्ग, मध्यमवर्गीयांना खूश करण्यावर भर दिला जाणार असून, जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या उद्देशाने इंग्लडच्या धर्तीवर राष्ट्रीय आरोग्य योजना जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
- मात्र अशा योजनांसाठी अधिकाधिक निधी वळवणे अनिवार्य असल्याने सरकारी खर्चात वाढ होणार असून, त्यामुळे वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 3.2 ते 3.5 टक्के होईल असा अंदाज आहे. सर्वसाधारपणे हे प्रमाण 3 टक्क्य़ांपर्यंत राखण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.
- आरोग्य सेवेत जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
- त्यातूनच इंग्लडच्या धर्तीवर आरोग्य सेवेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
- कृषी क्षेत्राला प्राधान्य दिले जात असले तरी देशातील शेतकरी वर्गात शेतमालाच्या पडलेल्या दरावरून नाराजीची भावना आहे.
- राज्य सरकारचा 2018-19 चा अर्थसंकल्प 9 मार्चला विधिमंडळात सादर केला जाणार आहे.
‘या’ राज्यात वेतनवाढ मिळण्याची शक्यता :
- कर्नाटक सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ करण्यासाठी जून 2017 मध्ये सहाव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती.
- वेतन आयोगाने आपल्या शिफारशींचा अहवाल राज्य सरकारला प्रदान केला. वेतन आयोगाने राज्य सरकारच्या 5.20 लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात 30 टक्के वाढ करण्याची शिफारस केली आहे.
- माजी आयएएस अधिकारी एम आर श्रीनिवासन मूर्ती हे या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते.
- यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री डी व्ही सदानंद गौडा यांच्या सरकारने वेतनवाढ केली होती. त्यांनी 22 टक्के वेतन वाढ दिली होती.
- केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्याला वेतन मिळावे अशी अपेक्षा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आहे.
- केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे 7 हजारांवरून 18 हजार इतके होईल.
- त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टरलाही 2.57 टक्के वाढींची मंजुरी दिली आहे. परंतु, केंद्रीय कर्मचाऱ्यांनी किमान 26 हजार करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर फिटमेंट फॅक्टरही वाढवून 3.68 टक्के करण्याची मागणी केली आहे.
‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’बद्दल रंजक गोष्टी :
- खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा खास तिहेरी नजराणा आकाशात पाहायला मिळाला आहे. हा दुर्मिळ योग पाहणं खगोलप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.
- यापूर्वी 152 वर्षांपूर्वी म्हणजेच 31 मार्च 1866 रोजी असा तिहेरी योग जुळून आला होता.
- 2018 नंतर 31 जानेवारी 2037 मध्ये ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’ पाहाण्याचा तिहेरी योग येणार आहे.
- या काळात चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो म्हणून चंद्रबिंब आकाराने मोठे दिसते.
- बुधवारी सूर्य नेहमीपेक्षा 14 % मोठा आणि 30 % अधिक प्रकाशमान दिसला.
- आजच्या दुर्मिळ योगात ‘ब्ल्यू मून’ही दिसणार आहे पण, गंमत म्हणजे यादिवशी चंद्र निळ्या रंगाचा दिसत नाही. एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ असं म्हटलं जातं.
- चंद्रबिंब लाल, तपकिरी रंगात पाहाण्याचा योग आला. या स्थितीला ‘ब्लड मून’ म्हटले जाते. खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने चंद्रबिंब लाल दिसते.
- सायंकाळी 6 ते 9 या वेळेत हा तिहेरी योग मुंबईकरांना पूर्व दिशेला पाहता आला आहे.
- अनेक ठिकाणी 1 तास 16 मिनिटे हे चंद्रग्रहण दिसले आहे.
- खगोल शास्त्रज्ञांनी याला ‘स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असं नाव दिलं आहे
- 26 मे 2021 रोजी सुपरमून आणि चंद्रग्रहण असा दुहेरी योग येणार आहे.
कर्नाटकात शाळांमध्ये कन्नड भाषा सक्तीस 10 फेब्रुवारीची डेडलाईन :
- कर्नाटकात कन्नड विषय सक्तीबाबत शिक्षण खात्याने राज्यातील खासगी शाळांना 10 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली आहे.
- सीबीएसई व आयसीएसईला संलग्न असलेल्या तसेच राज्याचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या राज्यातील सर्वच खासगी शाळांना कन्नड विषयाची सक्ती कर्नाटक सरकारने केली आहे.
- पुढील शैक्षणिक वर्षापासून या शाळांमधील विद्यार्थ्यांना कन्नड विषय शिकवावा लागेल. या शाळा कन्नड विषय शिकविणार की नाही हे शिक्षण खात्याला कळविण्यासाठी 10 फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे.
- कन्नड भाषा अध्ययन कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन कर्नाटक शासनाने राज्यातील सर्व खासगी शाळांमधील पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना कन्नड विषय शिकविण्याची सक्ती केली आहे.
- प्रथम किंवा द्वितीय भाषा म्हणून हा विषय तेथे शिकवावा लागणार आहे. शिक्षण खात्याने राज्यातील सर्व खासगी शाळांना ‘स्टुडंट्स अचिव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टम’ या प्रणालीचा वापर करून त्यात विद्यार्थ्यांच्या नावासमोर कन्नड विषय प्रथम किंवा द्वितीय भाषा म्हणून निवडल्याची नोंद करण्यास सांगितले.
- त्या माहितीच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षात कन्नड विषयाची किती पुस्तके मुद्रित करावी लागणार हे निश्चित केले जाणार आहे.
दिनविशेष :
- 1689 : गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.
- 1884 : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
- 1966 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.
- 2003 : अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी.
- 2013 : जागतिक बुरखा/हिजाब दिनाची स्थापना करण्यात आली.