Current Affairs of 5 June 2015 For MPSC Exams
‘फिफा’च्या ताज्या क्रमवारीमध्ये भारताची क्रमवाढ :
- ‘फिफा‘च्या ताज्या क्रमवारीमध्ये जगज्जेत्या जर्मनीने अव्वल स्थान असून तसेच बेल्जियमने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
- भारतीय संघानेही सहा क्रमांकांची प्रगती केली. असून आता जागतिक फुटबॉल क्रमवारीमध्ये भारत 141 व्या क्रमांकावर आहे.
- यापूर्वी भारत 147 व्या स्थानावर होता तर फुटबॉल खेळणाऱ्या आशियाई देशांच्या यादीत भारत 22 व्या क्रमांकावर आहे.
- आशियाई संघांमध्ये इराणला (41 वा क्रमांक) सर्वोच्च स्थान आहे. त्यांच्याखालोखाल जपान (52) आणि दक्षिण कोरिया (58) हे देश आहेत.
- ‘फिफा’ची क्रमवारी
- जर्मनी
- बेल्जियम
- अर्जेंटिना
- कोलंबिया
- ब्राझील
- नेदरलॅंड्स
- पोर्तुगाल
- उरुग्वे
- फ्रान्स
- स्पेन
Must Read (नक्की वाचा):
‘स्कॅवा’ या कंपनीचे इन्फोसिसने संपादन केले :
- ई-कॉमर्स सेवा पुरवणार्या ‘स्कॅवा‘ या कंपनीचे इन्फोसिसने संपादन केले आहे.
- इन्फोसिसने एप्रिलमध्ये ‘स्कॅवा‘ कंपनीचे संपादन करण्यासाठी करार केला होता.
- हा करार सुमारे 12 कोटी अमेरिकी डॉलर्सला करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींची मागितली गूगलने माफी :
- जगभरातील लोकांसाठी विश्वासाचे सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगातील पहिल्या दहा गुन्हेगारांच्या यादीत नाव जाहीर केले होती.
- गुगलवर ‘टॉप 10 क्रिमिनल्स’ म्हणून शोध घेतला असता कुख्यात दहशतवादी लादेन, दाउद सोबत मोदींचे छायाचित्र झळकत होते.
- यामुळे देशभरातून ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुगलने गुरुवारी तातडीने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
- सर्च इंजिनने दाखविलेल्या निकालांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाबद्दल दिलगीर व्यक्त करीत असल्याचे गुगलने म्हटले आहे.
- सर्च इंजिनने दाखविलेल्या निकालांचे गुगल समर्थन करीत नसून, यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही स्पष्ट करण्यात आले.
- गुगलवर चुकीची माहिती येण्याची ही पहिलीच वेळ नसून 2009 मध्येही अमेरिकेची प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्याबाबतही चुकीची माहिती दाखविण्यात आली होती.
बांगलादेश करणार अटलजींचा सन्मान
- 1971 च्या युद्धात पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशला स्वतंत्र करण्यात खासदार म्हणून मोलाची भूमिका पार पाडणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सन्मान करण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला आहे.
- वाजपेयी यांना ‘फ्रेंड्स ऑफ बांगलादेश लिबरेशन वॉर अवॉर्ड’ हा सन्मान देण्यात येणार आहे. आजारी असल्याने वाजपेयी बांगलादेशला येऊ शकत नाही. तथापि, येत्या ६ जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर येणार असल्याने, त्यांच्याकडेच हा पुरस्कार सोपविला जाणार आहे.
- 1971 मध्ये बांगलादेश मुक्ती लढा प्रारंभ झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच खासदार असलेले वाजपेयी यांनी बांगलादेश मुक्तीच्या समर्थनार्थ ठोस भूमिका स्वीकारली होती. भारतीय जनसंघाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेचे सदस्य या नात्याने त्यांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही बांगलादेशच्या हक्कासाठी लढा दिला.
- पंतप्रधान शेख हसीना यांनीही वाजपेयी यांचा सन्मान करण्याच्या निर्णयाला अंतिम मंजुरी दिली आहे.
- याशिवाय, बांगलादेश मुक्ती लढ्यात प्राणाहुती देणाऱ्या भारतीय जवानांच्या कुटुंबीयांचाही सन्मान करण्याचा निर्णय शेख हसीना यांनी घेतला आहे. या सर्व जवानांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांची स्वाक्षरी असलेले श्रद्धांजली प्रमाणपत्र आणि आभार व्यक्त करणारे पत्र पाठविणार आहेत.
- विशेष म्हणजे, बांगलादेश सरकारने यापूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘फ्रेंड्स ऑफ बांगलादेश लिबरेशन वॉर अवॉर्ड’ याच पुरस्काराने सन्मानित केले होते. हा सन्मान प्राप्त करणाऱ्या त्या भारताच्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या होत्या.
2012 मध्ये ढाक्यात आयोजित विशेष सोहळ्यात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता.
एचडीएफसीच्या एटीएममधून आता स्लिप मिळणार नाही
- आयसीआयसीआयपाठोपाठ खाजगी क्षेत्रातील दुसरी मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या एटीएम मशिनमधून पैशाचा व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराची स्लिप न देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
- स्लिपकरिता कागद लागतो आणि त्याकरिता बँकेला वेगळा खर्च सहन करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी बँकेने आर्थिक व्यवहाराची माहिती देणारी स्लिप न देण्याचा निर्णय घेतला असून, व्यवहार झाल्यानंतर ग्राहकाला थेट त्याच्या मोबाईलवर एसएमएस पाठवून व्यवहाराची अर्थात ग्राहकाने किती पैसे काढले आणि त्याच्या खात्यात आता किती पैसे जमा आहेत, याबाबतची माहिती देण्यात येणार आहे
- या बँकेने काही एटीएममध्ये ही योजना अमलात आणली आहे. जूनच्या अखेरपर्यंत देशातील सर्वच 11,700एटीएममध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- 5 जून – जागतिक पर्यावरण दिन
- 5 जून – परिसर स्वच्छता दिन