Current Affairs of 8 July 2015 For MPSC Exams
कझाकिस्तान दौऱ्यात ऊर्जा क्षेत्राला प्राधान्य
- मध्य आशियातील पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उझबेकिस्तानचा दौरा आटोपून कझाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत.
- कझाकिस्तानबरोबर ऊर्जा, सुरक्षा आणि व्यापार या मुद्यांवरील चर्चेस पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राधान्य देणार आहेत.
- कझाकिस्तान हा मध्य आशियातील सर्वांत मोठा देश असून तेल, नैसर्गिक वायू आणि युरेनियमचे मोठे साठे या देशामध्ये आहे, तसेच पोटॅशिअम, मॅंगेनीज, बॉक्साईट, तांबे आणि झिंक या खनिजांनीही हा देश समृद्ध आहे.
स्थानक जवळ आल्याचा येणार आता एसएमएस
- मुंबई राजधानीने रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांचे स्थानक आल्याचा संदेश पाठविण्याची सुविधा रेल्वे सुरू करत आहेत.
- ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना रात्री 11 ते सकाळी 6 च्या दरम्यान या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
- “डिजिटल इंडिया” अभियानाचा एक भाग म्हणून पेपरलेस तिकिटे काढता यावीत यासाठी रेल्वे मंत्रालयातर्फे लवकरच मोबाईल ऍप्लिकेशनही सुरू करण्यात येणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
फ्लिपकार्ट सप्टेंबरपासून केवळ “मोबाईल ऍप” वर
- ऑनलाईन खरेदी विश्वामधील भारतातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या “फ्लिपकार्ट” ने लवकरच आपले संकेतस्थळ बंद करुन केवळ “मोबाईल ऍप्लिकेशन” द्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे.
- येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत फ्लिपकार्टचे संकेतस्थळ पूर्णत: बंद केले जाणार आहे.
फेसबुकसाठी नवे ऍप “हू डिलिटेड मी” दाखल
- लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर लवकरच युजरला त्याच्या फ्रेंडने “अनफ्रेंड” केल्याची माहिती समजणार आहे व त्यासाठी नवे ऍप बाजारात दाखल झाले आहे.
- “हू डिलिटेड मी ऑन फेसबुक” हे “iOS” बेस्ड ऍप आपल्या फ्रेंड लिस्टवर नजर ठेवणार आहे.
- आतापर्यंत फेसबुकवरील एखाद्या युजरला त्याच्या फ्रेंडने “अन-फ्रेंड” केले तर त्याची माहिती समजत नव्हती किंवा त्याबाबतची सूचना मिळत नव्हती. पण यापुढे या ऍपद्वारे ती माहिती समजू शकणार आहे.