24 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

24 December 2019 Current Affairs In Marathi
24 December 2019 Current Affairs In Marathi

24 December 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2019)

हर्षवर्धन शृंगला नवे परराष्ट्र सचिव :

  • अनुभवी राजनैतिक अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांची नवे परराष्ट्र सचिव म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. ते विजय गोखले यांची जागा घेतील.
  • भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) 1984 च्या तुकडीचे अधिकारी असलेले शृंगला भारताच्या शेजारी देशांबाबतचे तज्ज्ञ मानले जातात.
  • तसेच सध्या ते अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहात आहेत.
  • तर वर्चस्ववादी ट्रम्प प्रशासन, लष्करी व आर्थिक प्रभाव वाढवण्याचा चीनचा प्रयत्न, अशी परराष्ट्र धोरणविषयक आव्हाने भारताला भेडसावत असताना शृंगला यांची नियुक्ती झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 डिसेंबर 2019)

गोलंदाज फिलँडरची निवृत्तीची घोषणा :

  • इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय वेगवान गोलंदाज व्हर्नन फिलँडरने जाहीर केला.
  • डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केलने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती पत्करल्यामुळे फिलँडरच्या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला आणखी एक धक्का बसला आहे.
  • तर 34 वर्षीय फिलँडरने 60 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 7 ट्वेन्टी-20 सामन्यांत प्रतिनिधित्व केले.
  • तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 22.16 च्या धावसरासरीने 216 बळी मिळवले आहेत.

कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धात राष्ट्रीय विक्रमांसह राखीला कांस्यपदक :

  • भारताची वेटलिफ्टिंगपटू राखी हॅल्डरने कतार आंतरराष्ट्रीय चषक वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 64 किलो गटात कांस्यपदक मिळवताना दोन राष्ट्रीय विक्रम नोंदवले.
  • राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राखीने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील स्नॅच आणि एकूण वजन उचलण्याचे दोन विक्रम मोडीत काढले.
  • तर तिने एकूण 218 किलो वजन उचलले.
  • भारताने या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत एकूण तीन पदकांची कमाई केली. माजी विश्वविजेत्या मिराबाई चानूने सुवर्णपदक मिळवले, तर जेरेमी लालरिनुंगाने रौप्यपदक पटकावले.
  • 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने या स्पर्धेतील गुण महत्त्वाचे ठरणार आहे.

WhatsApp मध्ये मिळणार दोन नवीन फीचर :

  • व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे. इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने दोन नवीन फीचर आणले आहेत.
  • व्हॉट्सअ‍ॅपसंबंधी माहिती देणाऱ्या WABetainfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये Haptic Touch चा सपोर्ट देण्यात येत आहे.
  • तर याशिवाय, डार्क थीममध्ये तीन ऑप्शन सुद्धा दिले जाणार आहेत.
  • व्हॉट्सअ‍ॅप डार्क मोडची टेस्टिंग सुरु आहे आणि यात तीन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑटो डार्क मोडचा ऑप्शन असणार आहे. याद्वारे जर तुम्ही अँड्राईड स्मार्टफोनमध्ये डार्क मोड यूज करणार असाल, तर व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा डार्क मोडमध्ये जाईल. Haptic Touch फीचरबाबत सांगायचे झाल्यास व्हॉट्सअ‍ॅप चॅट आणि मीडियामध्ये याचा सपोर्ट मिळणार आहे.
  • तसेच हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपच्या पुढील ऑफिशियल व्हर्जनमध्ये दिले जाणार आहे. हे व्हॉट्सअ‍ॅपचे 2.20.10 व्हर्जन असणार आहे.
  • डार्क मोडच्या माध्यमातून युजर्संना एक ऑप्शन लो डेटा मोड सुद्धा दिले जाणार आहे. म्हणजेच, जर तुमचा स्मार्टफोन बॅटरी सेव्हर मोडवर आहे, तर व्हॉट्सअ‍ॅप स्वत: डार्क मोडवर जाईल.

फोर्ब्स इंडियाच्या यादीत मराठमोळ्या जोडीचा समावेश :

  • फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे.
    तर या यादीत अजय-अतुलची जोडी 22 व्या क्रमांकावर असून या जोडीची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे.
  • फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रीटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे.
  • पण पहिल्यांदाच या यादीत एका मराठमोळ्या संगीतकाराच्या जोडीची वर्णी लावली आहे. हे संगीतकार दुसरे कोणीही नसून मराठी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल आहेत. या यादीत ही जोडी 22 व्या क्रमांकावर असून या जोडीची वार्षिक कमाई 77.91 कोटी आहे.
  • फोर्ब्स इंडियाच्या यादीत पहिल्या स्थानावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीची वार्षिक कमाई 252.72 कोटी आहे. तर दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमारने स्थान मिळवले आहे. अक्षयची वार्षिक कमाई 293.25 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान आहे. सलमानची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

दिनविशेष:

  • सन 1777 मध्ये कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
  • स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म 24 डिसेंबर 1880 मध्ये झाला होता.
  • बालसाहित्यक, समाजवादी नेते, समाजसुधारक तसेच स्वातंत्र्यसैनिक ‘पाडुरंग सदाशिव साने‘ उर्फ साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर सन 1899 रोजी झाला होता.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 24 डिसेंबर सन 1910 रोजी जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 डिसेंबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.