15 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जागतिक ग्राहक हक्क दिन
जागतिक ग्राहक हक्क दिन

15 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 मार्च 2020)

अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर :

  • करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संबोधिक करताना त्यांनी ही घोषणा केली.
  • तसंच याचा सामना करण्यासाठी राज्यांना 50 अब्ज डॉलर्सचा निधी देणार असल्याचंही जाहीर केलं. करोना थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर 15 कोटी लोकांना या आजाराची लागण होऊ शकते, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं.
  • अमेरिकेत आतापर्यंत 1100 पेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी स्पेननही करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मार्च 2020)

मस्कत खुली टेबल टेनिस स्पर्धात जीत चंद्राला विजेतेपद :

  • भारताचा उदयोन्मुख टेबल टेनिसपटू जीत चंद्रा याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मानव ठक्करला पराभवाचा धक्का देत 2020 ‘आयटीटीएफ’ चॅलेंजर प्लस ओमान खुल्या टेबल टेनिस स्पर्धेच्या 21 वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले.
  • जागतिक क्रमवारीत 18व्या स्थानी असलेल्या हरयाणाच्या जीतने आपल्याच देशाच्या मानव ठक्करला 24 मिनिटे रंगलेल्या या लढतीत 11-6, 11-7, 13-11 असे सहज हरवत विजेतेपद मिळवले. पहिले दोन सेट आरामात जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये जीतला मानवकडून कडवा प्रतिकार सहन करावा लागला. पण जीतने आपला अनुभव पणाला लावत विजेतेपद प्राप्त केले. मानवला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
  • जीत, मानवसह मानूष शाह आणि एस. स्नेहित या भारताच्याच खेळाडूंनी उपांत्य फेरीत धडक मारली होती. मानवने स्नेहितला रोमहर्षक लढतीत पराभूत केले होते. जीतने मानूषला हरवून अंतिम फेरी गाठली होती.

दिनविशेष:

  • 15 मार्च : जागतिक ग्राहक हक्क दिन
  • 15 मार्च 1493 मध्ये भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.
  • मुघल सम्राट अकबर याने 15 मार्च 1564 मध्ये हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
  • 15 मार्च 1680 मध्ये शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह.
  • मेन हे अमेरिकेचे 15 मार्च 1820 मध्ये 23वे राज्य बनले.
  • 15 मार्च 1827 मध्ये टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मार्च 2020)

You might also like
1 Comment
  1. Nilesh Patil says

    Nice post

Leave A Reply

Your email address will not be published.